Ticker

6/recent/ticker-posts

बीड जि.प. प्रशासनाकडुन राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षकवर झाला होता अन्याय .......... अखेर "विजय" आमटे यांना मिळाला न्याय

आष्टी (प्रतिनिधी) शिक्षक दिन आठवड्यावर आलेला असताना बीड जिल्हा परिषदेत अनेक वर्ष निष्ठेने व प्रमाणिकपणे काम करणाऱ्या एका राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षकाचा प्रशासकिय वनवास संपला आहे.बीड जि.प.च्या प्रशासनाने या शिक्षकावर अन्याय केला परंतु अखेर सत्याचा " विजय " झाला आहे.विजय आमटे यांना त्यांच्याच लाडक्या आष्टी तालुक्यातील बांदखेल जि.प.प्रा. शा.मध्ये पुर्ननियुक्ती मिळाली आहे. आष्टी तालुक्यातील विजय आमटे हे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक आहेत.राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते त्यांचा सन्मान झाला होता. त्यानंतर बीड जि.प. ने राष्ट्रपती पुरस्कार निवड समितीवर सदस्य म्हणून सुध्दा विजय आमटे यांची नियुक्ती केली होती. विजय आमटे यांनी आष्टी तालुक्यातील बांदखेलची शाळा महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आणली. बीड जि.प.च्या शिक्षण समितीची बैठक इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या जि.प.शाळेत आयोजित करण्यात आली.हीच बांदलची शाळा.राज्य शासनाच्या आदेशानुसार केंद्रप्रमुख या पदावर पदोन्नती मिळावी यासाठी विजय आमटे बीड जि.प. प्रशासनाकडे विनंती अर्ज करत होते.सर्व नियमात असताना देखील या राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षकाला बीड जि.प.चे प्रशासन न्याय देत नव्हते. न्याय देणे तर सोडाच उलट चुकीचे आरोप करून विजय आमटे यांना जानेवारी २०२४ मध्ये बीड जि.प.ने थेट निलंबित केले.या कारवाईमुळे विजय आमटे यांची मानसिक अवस्था पुर्णतः ढासळली होती.अगदी आत्महत्या करावी इथपर्यंत विचार त्यांच्या मनात येत होते परंतु जवळच्या अनेक सहका-यांनी त्यांना या वाईट काळामध्ये सावरले. त्यानंतर बीड जि.प. ने त्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले.या विभागीय चौकशीचा अहवाल डिसेंबर २०२४ मध्येच आला आणि या चौकशीत विजय आमटे निर्दोष ठरले तरी देखील सुडाने पेटलेल्या बीड जि.प. प्रशासनाने विजय आमटे यांचे निलंबन रद्द करून त्यांना अत्यंत गैरसोयीच्या असलेल्या चकलांबा येथील शाळेत नियुक्ती दिली. सत्यासाठी चाललेला संघर्ष सुरुच असताना अखेर ऑनलाईन प्रक्रियेमध्ये आमटे यांना आता त्यांच्या पुर्वीच्याच बांदखेल जि.प.शाळेत पदस्थापना मिळाली आहे.ज्या शाळेला त्यांनी आपल्या पोटच्या लेकराप्रमाणे जोपासले त्या शाळेत त्यांना पुन्हा एकदा नियुक्ती मिळाल्याने एक प्रकारे सत्याचा (आमटेचाच) " विजय " झाला आहे.शिक्षक दिनाच्या एक आठवडा आधी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षकाचा शासकिय वनवास संपला आहे.विजय आमटे यांचे मित्र परिवार व सहकारी शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या