आष्टी (प्रतिनिधी)
गावाच्या विकासासाठी समर्पित भावनेने काम करणाऱ्या सरपंचांना दरवर्षी 'भूमिपुत्र पुरस्कार'
देऊन सन्मानित केले जाते.या पुरस्कारासाठी आष्टी तालुक्यातील सांगवी पाटणचे सरपंच दत्तात्रय
खोटे यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली.शनिवार दि.२३ ऑगस्ट रोजी झालेल्या समारंभात
महामहीम राज्यपाल हरिभाऊ बागडे,माजी मंत्री राजेंद्र दर्डा आणि संपादक नंदकिशोर पाटील यांच्या
हस्ते त्यांना हा लोकमत भूमिपुत्र राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
ग्रामीण भागातील समाजकारण,शिक्षण,कृषी, जलसंधारण,पर्यायवरण, ग्रामविकास आदि क्षेत्रात
केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे आणि गावाला विकासाच्या मार्गावर नेण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना
या पुरस्काराद्वारे गौरवण्यात आले.पुरस्कार स्वरूपी स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात
आला. सरपंच दत्तात्रय खोटे यांना भूमिपुत्र पुरस्कार मिळाल्याबद्दल सांगवी पाटण परिसरात
वातावरण आहे. ग्रामस्थांनी व सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी सरपंच यांच्या या सन्मानाचे अभिनंदन
केले आहे.
0 टिप्पण्या