Ticker

6/recent/ticker-posts

कड्याचे माजी सरपंच संपतदादा सांगळे यांचे निधन

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील कडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा उद्योगपती संपतदादा दिनकर सांगळे (वय ५१) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.त्यांच्यावर कडा येथील वैकुंठभुमीत हजारोंच्या संख्येच्या जनसमुदायच्या उपस्थितीत रात्री ७ वा. अंत्यसंस्कार करण्यात आले. कडा शहराचे माजी सरपंच संपतदादा सांगळे यांचे शनिवार रोजी दुपारी २ च्या दरम्यान ह्रदयविकाराच्या झटक्याने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्यावर कडा येथील स्मशानभूमीत रात्री हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.त्यांच्यापाठीमागे पत्नी, अमर हा मुलगा, दोन मुली जावाई,नातवंडे असा परिवार आहे. अंत्यविधीस आ. बाळासाहेब आजबे, ह.भ.प. राऊत दादा महाराज,संतोष महाराज मोरे, देवीदास धस, राजेंद्र धोंडे,उध्दव दरेकर, शाम धस, बाबासाहेब गुंजाळ, संपत म्हस्के, सभापती रमजान तांंबोळी,आण्णासाहेब चौधरी, पांडुरंग कर्डीले महाराज, अनिलतात्या ढोबळे,युवराज पाटील,संजयनाना ढोबळे, आदिनाथ सानप,सुनिल नाथ, नामदेव राऊत, हरिभाऊ मार्केडे, प्राचार्य डाॕ.हरिदास विधाते, विठ्ठलराव बन्सोडे,गौतम सावंत,पोपट घुले,सुनिल म्हेत्रे, विक्रम पोकळे,उत्तम बोडखे, गंगाआबा आजबे, स्वप्निल घुले,रामशेठ मधुरकर,सतिषशेठ धस,गौतम आजबे, तुळशीराम आडसरे महाराज, बाबासाहेब मुळीक,सिध्देश्वर शेंडगे,सुनिल रेडेकर,बन्शीभाऊ पोकळे,बाळासाहेब निकम, विक्रम नरवडे,दिलीपराव काळे,उपप्राचार्य डाॕ.भास्कर चव्हाण आदि राजकीय, सामाजिक, धार्मिक,व्यापार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. ----------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या