Ticker

6/recent/ticker-posts

स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे आदर्श शिक्षक व उपक्रमशील शाळा पुरस्कार जाहिर

आष्टी (प्रतिनिधी ) आष्टी तालुक्यातील प्रगतशील व नावलौकिक असलेली कडा येथील स्वामी विवेकानंद शिक्षकांची सहकारी पतसंस्थेचे सन २०२५- २०२६ चे आदर्श शिक्षक व उपक्रमशील शाळा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत अशी माहिती चेअरमन मारुती पठाडे आणि संचालक मंडळाने प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे. प्रतिवर्षा प्रमाणे शैक्षणिक, सामाजिक, क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणा-या शिक्षकांना स्वामी विवेकानंद शिक्षक पतसंस्थेतर्फे " आदर्श शिक्षक " निवड करून त्यांचा संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सत्कार करण्यात येत असतो.शाळेमध्ये विविध उपक्रम राबवणाऱ्या उपक्रमशील शाळांची निवड प्रतिवर्षी करण्यात येते.त्या शाळेंचाही सत्कार समारंभ संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये करण्यात येत असतो. त्यानुसार सन २०२५-२०२६ साठीचे आदर्श शिक्षक पुरस्कार व उपक्रमशील शाळांची नावे पुढीलप्रमाणे.... भाऊसाहेब चव्हाण (माध्यमिक शाळा सुलेमान देवळा), नेमाजी लटपटे (केंद्र बेलगाव),संतोष दाणी (केंद्र शिराळ) आजिनाथ मिसाळ (केंद्र ब्रम्हगांव) शेषराव तोतरे (केंद्र जामगांव), भागवत शेकडे (केंद्र खिळद),बाळु शिरसाठ (केंद्र अंभोरा),संजय कचरे (केंद्र पारगांव जो.),नवनाथ चौधरी (केंद्र धामणगाव), नारायण एकशिंगे (केंद्र रूईनालकोल), संजय सरडे (केंद्र कडा),अशोक लोखंडे (केंद्र पिंपळा),श्रीमती वर्षा मोटे वर्षा (केंद्र मातकुळी), रामनाथ गुंजाळ (केंद्र सावरगांव), कैलास चंदनशिव (केंद्र देवळाली), संभाजी बडे (केंद्र पाटसरा), नवनाथ टेकाळे (केंद्र खुंटेफळ), श्रीमती फर्जना शेख (दौलावडगाव), श्रीमती मिनाक्षी थोरवे (केंद्र धानोरा), देविदास शिंदे (कन्या प्रशाला आष्टी ),श्रीमती विजया रुपनर (केंद्र कडा),विलास चौधरी (केंद्र कडा), अर्जुन ढोबळे (केंद्र डोईठाण) यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर झाले तर विशेष आदर्श शिक्षक पुरस्कार तुषार अशोक पवार (केंद्र मातकुळी) यांचा समावेश आहे तर उपक्रमशिल शाळा. इयत्ता पहिली ते पाचवी -जि.प. प्राथमिक शाळा बाळेवाडी (केंद्र धानोरा ), इयत्ता पहिली ते सातवी - जि.प.प्राथमिक शाळा केरुळ (केंद्र खिळद), ८ वी. ते १० वी.जि.प. माध्यमिक शाळा धामणगाव (अनुदानीत) यांची निवड करण्यात आली असल्याचे चेअरमन मारुती पठाडे यांनी सांगितले. ---------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या