आष्टी (प्रतिनिधी)
राज्यातील २८ हजार ग्रामपंचायतीमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानच्या माध्यमातून ग्रामीण भागातील चेहरा मोहरा बदलणार आहे.या अभिनयाच्या काळात आपण दोन महिने घरी जाणार नसून या काळात विविध गावात जाऊन ही योजना प्रभावी पणे कसे राबवले जाईल यासाठी काम करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांनी केले. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंडळाच्या सभागृहात आयोजित राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी राज्याच्या ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले,आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार,यशदाचे उपमहासंचालक मल्लिनाथ कलशेट्टी,सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्यासह राज्यातील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी सरपंच तसेच पंचायत अधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री ना.गोरे पुढे बोलताना म्हणाले की राज्यातील सरपंच मंडळी शिवाय हे अभियान पूर्ण होऊ शकत नाही हे अभियान न राहता एक चळवळ झाली पाहिजे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ही माझी संकल्पना जरी असली तरी राज्याचे मुख्यमंत्री हे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याने आणि या अभियान काळात ते सुद्धा १० दिवस या अभियानासाठी वेळ देणार आहेत मी मातीत काम करणारा कार्यकर्ता असून वॉटर कप स्पर्धासह अनेक स्पर्धेत आपण भाग घेतलेला आहे मी यापूर्वी मोठ्या प्रमाणावर पाण्यावर काम केल्याने मला मंत्रिपद मिळताना ग्रामविकास खाते मिळेल अशी मी कल्पनाही केली नव्हती मला पाणी क्षेत्रात काम करायची आवड असल्याने कदाचित मुख्यमंत्री मला पाण्याचे खाते देतील अशी आशा होती मात्र मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर ग्रामविकास ची जबाबदारी टाकून आर.आर. पाटलांच्या काळात जशी चळवळ उभी झाली होती अशी चळवळ आपण उभारावी आपल्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत असे म्हटल्याने माझ्यावर सहाजिकच जबाबदारी वाढली आहे. ही योजना राबविताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे या योजनेचे नायक आहेत खरं तर गटविकास अधिकाऱ्यांना काम करत असताना मोठ्या संधी आहेत आणि या अभियानातून त्यांनी त्या पूर्ण कराव्यात या अभियानात काम करताना विविध सामाजिक संघटना, सरपंच परिषद, माजी सैनिक, बचत गट यांच्याकडुन अपेक्षा असल्याचे ही गोरे म्हणाले यावेळी यशदाचे महासंचालक मल्लिनाथ कलशेट्टी यांचा कार्याचा गौरव करत एवढी ऊर्जा तुमच्यात येते कुठून आणि यासाठी तुमच्याकडून ती समजून घ्यावी लागेल असेही म्हटले गोंदिया जिल्ह्यातील सरपंच योगेश्वरी चौधरी यांच्या कामाचाही ग्रामविकास मंत्र्यांनी उल्लेख केला सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या वतीने राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्याचा महत्त्वकांक्षी निर्णय घेतल्याबद्दल ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांचा सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सत्कार केला. या प्रशिक्षण कार्यक्रमात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान ची रूपरेखा ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त सचिव एकनाथ डवले यशदाचे उपमहासंचालक मल्लिनाथ कलशेट्टी यांनी मांडले राज्यातील ग्रामविकासाच्या चळवळी बाबत पद्मश्री पोपटराव पवार यांनी २००२ पासून आजपर्यंत राज्यात आलेले सर्व अभियान तसेच हिवरे बाजारच्या यशाचे गमक हे राज्यभरातून आलेल्या विविध अधिकारी सरपंच पंचायत राज अधिकारी यांच्यासमोर मांडत हे अभियान आपण यशस्वी करावे असे आवाहन केले. यावेळी सर्व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,उपमुख्य कार्यकारी अधिकारी त्याचप्रमाणे गटविकास अधिकारी,राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून पंधरा सरपंच पंधरा पंचायत अधिकारी त्याचप्रमाणे सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे राज्य विश्वस्त तथा कोषाध्यक्ष आनंदराव जाधव राज्य कोअर कमिटीचे प्रमुखआबासाहेब सोनवणे, राज्य प्रसिद्धी प्रमुख संजय बापू जगदाळे, उत्तर विभागीय अध्यक्ष राजमल भागवत, शत्रुघ्न धनवडे यांच्यासह अनेक अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.

चौकट
------------
राज्यातील पंचायत राज व्यवस्थेला नवी दिशा देण्याची गरज असून स्व.आर.आर. पाटील यांच्या काळात राज्यात ग्राम स्वच्छता अभियान हागणदारीमुक्त गाव ही योजना राबवली गेली होती आज राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ची सुरुवात होत असून मुख्यमंत्री ना.फडणवीस यांनी या राज्यातील सरपंचांना मान सन्मान मिळवून दिला आहे थेट जनतेतून सरपंचाची निवडणूक व गाव गाड्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावल्याने आणि ग्रामविकास मंत्री पदाची धुरा अगदी मातीत काम करणाऱ्या ज्यांना गाव गाड्याची जाण आहे अशा जयकुमार गोरे यांच्याकडे आल्यामुळे राज्यातील सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचे सर्व पदाधिकारी व राज्यातील सरपंच उपसरपंच सदस्य या अभियानात हिरारीने भाग घेत अभियानाचे रूपांतर चळवळीत करण्यासाठी सरपंच परिषद गाव पातळीवर जाऊन काम करणार असल्याचे सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले
0 टिप्पण्या