
आष्टी (प्रतिनिधी)
कर्म सेवामय झाले की जीवन सुगंधित होते.आई वडील म्हणजे संस्कार
पीठ असतात असे सांगून मुलं मुली आणि एकूण काढावा लागतो शिकवण समूहामधून मिळते.
संस्कार संपन्न पुत्र ही सर्वात मोठी संपत्ती असते असे प्रतिपादन भारतीय जनता
पार्टीचे अहिल्यानगर जिल्हा सरचिटणीस तथा उद्योजक सामाजिक कार्यकर्ते अरुणभाऊ मुंढे
यांनी केले. सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. योगेश फुंदे आणि डॉ.सरोजिनी फुंदे
यांचे चिरंजीव शर्वील याच्या वाढदिवसानिमित्त वैचारिक मंथन आणि स्नेहभजनाचे आयोजन
केले होते.यावेळी उपस्थिती लावत शर्वीलला शुभेच्छा दिल्यानंतर अनौपचारिक संवाद
साधताना अरुणभाऊ मुंढे बोलत होते. यावेळी मंचावर सुप्रसिद्ध विधीज्ञ ॲड.संजय सानप,
निवेदक तथा वृत्तपत्र लेखक प्रा.बिभिषण चाटे,निवृत्त तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी
मुकुंदराव मुंडे,निवृत्त गटविकास अधिकारी फुंदे मान्यवर उपस्थित होते.अरुणभाऊ मुंढे
पुढे म्हणाले की, उत्तम आचार विचार दृष्टी व कृती श्रेष्ठ पदावर नेते कौतुक करायला
शब्द नव्हे तर भावना लागतात. बाभळीच्या झाड पावलों पावली आढळते; परंतु चंदन शोधावे
लागते.शर्विल याच्या वाढदिवसानिमित्त या वैचारिक स्नेह मेळाव्यात विविध क्षेत्रातील
मान्यवर तसेच महिला भगिनी, जेष्ठ नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट --------- आजची मुले भविष्यातील राष्ट्राचा भक्कम पाय असतात. श्वासाबरोबरच
ध्यास घेऊन जगणारी पिढी बलवान बनते. पवित्र मनाच्या शेतीतून अमृताची फळे येत असतात.
आई वडील हेच सर्वात प्रथम गुरु असून उत्तम आनंदी वैचारिक कार्यक्रमातून आयुष्य
वाढते असे सांगत काळाबरोबर बदलण्यात यश असते.आई- वडील,शिक्षक आणि वातावरणाची जाणीव
ठेवा असा सल्ला संजय सानप यांनी दिला.
----------------------------------------
0 टिप्पण्या