
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुका ग्रामपंचायत कामगार,कर्मचारी महासंघाचा सोमवारी
दि.४ आॕगस्ट २०२५ रोजी आष्टी पंचायत समिती सभगृहात ११.३० वा.मेळावा होणार आहे. या
मेळाव्यास सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन
ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष काॕ.सुरेश निकाळजे व तालुकाध्यक्ष
काॕ.मधुकर कर्डीले यांनी केले आहे. आष्टी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कामगारांना
व कर्मचारी यांना या मेळाव्याच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की,आज रोजीपर्यंत ३०
ते ३५ वर्षापासून महाराष्ट्र राज्य ग्रामविकास व पंचायत राज समिती कडून रु पगार २५०
रु.पासून ते १२ हजार ते १३ हजार रु.पर्यंत पगाराची मजल मारलेली आहे.काही मागण्याची
अंमलबजावणी झाली तर काही मागण्यांची अमंलबजावणी झालेली नाही.प्रत्येक जिल्हा परिषद
व प्रत्येक तालुकानिहाय राहिल्यामुळे खालील मुद्द्यावर मेळावा होत आहे. अभय आवलकर
समितीच्या शिफारशी लागू करा,५४ महिन्याचा एरीअस शासनाकडे थकीत असून फक्त १९
महिन्याचा एरीअस आजून ३५ महीन्याचा थकीत एरीअस ताबडतोब द्या,किमान वेतनाची मुदत
२०२३ ला संपली असून ५ वर्षे पूर्ण झाली आहे असुन ६ हजार रु पगार वाढ झाली यांची
अंमलबजावणी ताबडतोब करावी,किमान वेतनाप्रमाणे आता सध्या १२ हजार रु पगार आहे, त्या
मध्ये ६ हजार रु वाढ करून १८ हजार रु पगाराची अंमलबजावणी करावी, राहणीमान भत्ता
आजपर्यंत थकीत असून प्रत्येक ग्राम १०० टक्के शासनाच्या तिजोरीतून द्यावा,राहणीमान
भत्ता आज रोजीपर्यंत ग्रामपंचायतकडे १५ वर्षे झाले तरी थकीत राहणीमान भत्याच्या
रकमा ग्रामपंचायतकडून द्यावा, जीपीएफच्या अर्धा हिस्स्याची रक्कम रुपये थकीत
ग्रामपंचायतकडून कामगाराच्या खात्यात ताबडतोब खात्यात जमा करावी,करवसुली असूनसुद्धा
वसुली नाही म्हणून राहणीमान भत्त्यापासून व जीपीएफच्या अर्ध्या हिस्सापासून
ग्रामपंचायत कामगारांना वंचित ठेऊ नका, त्यांची दिशाभूल करू नका, प्रत्येक
महिन्याच्या ५-६ तारखेला पगार झाला पाहिजे, सेवानिवृत्ती होणे आगोदर ग्रामपंचायत
कामगाराची मागील सर्व थकीत राहणीमान भत्ता व जीपीएफच्या सर्व थकीत रुपये रक्कम देऊन
गटविकास अधिकारी,विस्तार अधिकारी व ग्रामविकास अधिकारी,सरपंचाच्यासहीने सेवानिवृत्त
झाला अशी लेखी स्वरूपात आदेश देऊन कमी करावे,महाराष्ट्र राज्य ग्रामविकास खात्या
मार्फत १० टक्के आरक्षणाची अमंलबजावणी करून जिल्हा परिषदला आदेश देऊन ताबडतोब भरती
प्रक्रिया सुरु करावी या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत
कामगार,कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस कॉ.नामदेव चव्हाण,जिल्हा कार्यकरणी, कॉ.भागवत
वंजारे,कॉ.गोरख पिंगळे हे उपस्थित राहणार आहेत.या मेळाव्यास आष्टीचे गटविकास
अधिकारी गोकुळ बागलाने,विस्तार अधिकारी जायभाये,विस्तार अधिकारी एन.डी. शिंदे,आष्टी
तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य हे उपस्थित राहणार
आहेत. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता उपस्थित रहावे असे
आवाहन बीड जिल्हा ग्रामपंचायत कामगार,कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कॉ.सुरेश
निकाळजे,आष्टीचे तालुकाध्यक्ष कॉ.मधुकर कर्डिले,सर्व उपाध्यक्ष सर्व सदस्य यांनी
केले आहे. जिव्हाळ्याच्या मागण्यांवर या मेळाव्यात चर्चा होणार आहे. पुढील
आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे.
------------------
0 टिप्पण्या