आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्याचे सुपुत्र सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA)
दिल्ली येथे केंद्रीय प्रतिनियुक्तीवर असलेले अपर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांची
मुंबई येथे पोलीस उपआयुक्त पदावर गृह विभागाने गुरुवारी काढलेल्या आदेशानुसार
नियुक्ती करण्यात आली आहे.बन्सोडे यांनी आजवर मिरज,अ.नगर, नाशिक,नवी मुंबई आदी
ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून यशस्वीपणे कामगिरी केली आहे.बुलढाणा येथे
अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी कारकीर्द गाजवली होती.त्यांनी आपल्या
कारकिर्दीत अनेक मोठे गुन्हे उघडकीस आणून पोलीस खात्याची मान उंचावेल अशी कामगिरी
केली आहे.त्याची दखल घेऊन केंद्रीय गृह विभागाने त्यांना सन २०२२ मध्ये तीन वर्ष
राष्ट्रीय तपास यंत्रणा (N I A ) मधे तीन वर्षे काम करण्याची संधी दिली होती.तिथेही
आपल्या कार्याचा ठसा उमटवत देशसंरक्षणा साठी सर्वोच्च अशी कामगिरी केली आहे.त्यांनी
अनेक ठिकाणी धाडसी कारवाया करून अट्टल गुन्हेगारांना जेलची हवा दाखवली आहे.
त्याबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी गौरविण्यात आले आहे.आता मुंबई येथे
पोलीस उपआयुक्त पदावर गृह विभागाने जबाबदारी दिली आहे.
0 टिप्पण्या