Ticker

6/recent/ticker-posts

शेतमजूरी करणाऱ्या कुटुंबातील दत्तात्रय किटाळे बनले 'डॉक्टरेट'

आष्टी (प्रतिनिधी ) ? डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,छत्रपती संभाजीनगरने नुकतीच दत्तात्रय आसाराम किटाळे यांना हिंदी विषयात पीएच.डी.पदवी प्रदान केली.दत्तात्रय किटाळे यांनी "समकालीन भारतीय साहित्य पत्रिका में अनूदित भारतीय कविता : संवेदना एवं शिल्प (सन २००१ से २०१० के विशेष संदर्भ में)" या विषयावरील प्रबंध विद्यापीठाच्या हिंदी विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ.सुधाकर शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला. दत्तात्रय किटाळे हे त्यांच्या कुटुंबातील पहिले पहिली पास ते पीएच.डी.धारक आहेत. शेतमजूरी करुन पोट भरणाऱ्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. शिक्षणासाठी अथक मेहनत व परिश्रम घेत त्यांनी पीएच.डी. ही शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी प्राप्त केली. काम करत-करत शिक्षण घेत त्यांनी हे घवघवित यश मिळवले आहे.घरची आर्थिक स्थिति बेताचीच असताना देखील त्यांनी जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर हा शैक्षणिक प्रवास गाठला. आपल्या शिक्षणासाठी त्यांनी कधी वेटर,कधी कॉल सेंटर, कधी स्क्रैप तर कधी कैरेट व गोन्या उचलन्याचे काम केले.त्यांचे आई-वडील कधी शाळेत नाही गेले परंतु त्यांनी आपल्या मुलाला डॉक्टरेट बनवले हे विशेष.दत्तात्रय किटाळे यांच्या शैक्षणिक ताफ़्यात एम.ए.,बी.एड., टेट,अनुवाद पदविका, एम.फिल.,सेट,नेट या पदव्या आहेत.त्यात आता त्यांनी सर्वोच्च पीएच.डी.पदवी मिळवल्याने त्यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.त्यांच्या या घवघवित यशाबद्दल हिंदी विभागप्रमुख डॉ.संजय राठोड,मार्गदर्शक डॉ.सुधाकर शेंडगे,डॉ.भारती गोरे,डॉ.माधव सोनटक्के प्राचार्य डॉ.भारत खंदारे,प्राचार्य डॉ.माणिकराव थिटे, डॉ.ज्ञानेश्वर महाजन,डॉ.दत्तात्रय गिरी, सुधाकर चव्हाण,आसाराम किटाळे,एकनाथ किटाळे, राजेश देशमाने, सेट,नेट पीएच.डी. धारक संघर्ष समितीच्या बीड जिल्हा समन्वयक आशा फड तसेच नातेवाईक,मित्र परिवार व समस्त गावकऱ्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. चौकट -------- अत्यंत गरीब शेतमजुरी करणाऱ्या कुटुंबातील दत्तात्रय किटाळे यांनी आपल्या प्रचंड मेहनत जिद्द चिकाटी आत्मविश्वास आणि परिसराच्या जोरावर हिंदी साहित्य क्षेत्रात प्रचंड ग्रंथ संपदा यांचा अभ्यास करून केलेले संशोधन आणि त्यातून मिळवलेली डॉक्टरेट ही समस्त संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी बाब आहे!' अशी प्रतिक्रिया नेट-सेट धारक संघर्ष समितीच्या बीड जिल्हा समन्वयक आशा फड यांनी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या