Ticker

6/recent/ticker-posts

जोगेश्वरी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त पाणी बचत यंत्रांचे वितरण -------------------------- पाणी बचत करणे ही काळाची गरज ........ युवा शास्रज्ञ रणजित राऊत

आष्टी (प्रतिनिधी) सेवावर्धिनी पुणे व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विचारमंच,माहिजळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ७९ व्या. स्वातंत्र्य दिनानिमित्त जोगेश्वरी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांना पाणी बचत यंत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून युवा शास्त्रज्ञ रणजित राऊत उपस्थित होते.प्रमुख अतिथी म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विचारमंच, माहिजळगावचे अध्यक्ष नवनाथ शिंदे, सचिव जयेश कांबळे, उपाध्यक्ष पायल शिंदे, जोगेश्वरी इंग्लिश मिडीयम स्कूलचे संस्थापक राहुल तोरडमल व मोना तोरडमल, डॉ.वर्षा निंभोरे, स्वप्निल भिसे,ज्ञानेश्वर निंभोरे, खेडकर,दादा शिंदे,हनुमंत माने, शेखर लवांडे,तानाजी खेडकर, आकाश शेटे,महादेव गरड, भोईटे,विक्रम फाळके,चौधरी, गणेश गायकवाड, मोना तोरडमल, शोभा शिंदे,मनीषा हाके,रामदास टकले (मेजर), विष्णु जाधव,शिक्षक,विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमात युवा शास्त्रज्ञ रणजित राऊत व समाजसेवक जयेश कांबळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाणी बचत यंत्रांचे वाटप करण्यात आले.यावेळी युवा शास्त्रज्ञ राऊत यांनी पाणी बचत करणे ही काळाची गरज आहे असे मत व्यक्त केले व पाण्याचे महत्व,पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जलसंवर्धनाची गरज याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी पाणी वाचवण्याची शपथ घेतली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या