Ticker

6/recent/ticker-posts

शिरीषभाऊ थोरवे यांचा राज्यस्तरीय शब्दगंध सामाजिक कार्य गौरव पुरस्कार देऊन सन्मान

आष्टी (प्रतिनिधी) शब्दगंध साहित्यिक परिषद,महाराष्ट्र राज्य यांचे दुसरे राज्यस्तरीय मध्यवर्ती साहित्य संवाद व कवी संमेलन आळंदी येथे नुकतेच पार पडले. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा दिव्यांग नेते शिरीषभाऊ शिवराम थोरवे यांनी समाजाप्रती केलेले कामाची दखल घेतली आहे. त्यांनी आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, २७ वेळा रक्तदान केले आहे.कोविडच्या काळात दिव्यांगांना किराणा,दिव्यांगाचे तपासणी,तीन चाकी सायकल वाटप, मुलांना ड्रेस वाटप आदि सामाजिक उपक्रम राबविले होते.थोरवे यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय शब्दगंध सामाजिक कार्यगौरव पुरस्कार २०२५ देऊन सामाजिक कार्यकर्त्यांना नवे मापदंड रचणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याचा शाल, श्रीफळ, ट्रॉफी, सन्मान पत्र देऊन सन्मान केला. याप्रसंगी शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक सचिव सुनील गोसावी, उदागे महाराज संमेलनाध्यक्ष उद्योगपती फकीरा पवार,प्राचार्य खासेराव शितोळे सर,कवी सांगळे सर,घुले,संपादक डॉ.कमलकांत वडेलकर यांचे हस्ते गौरविण्यात आले.थोरवे यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल
माजी मंत्री आ.सुरेश धस,माजी आ. साहेबराव दरेकर, शशिकांत गाडे, जे.आर.पवार, माऊली अप्पा जरांगे,डॉ.सोपान निंबोरे,इंजि.रमेश ढोबळे पाटील, परमेश्वरकाका शेळके,माजी सभापती अंकुश चव्हाण,कांतीलाल चनोदीया,पत्रकार अनील लगड,जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे,जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,पत्रकार सूर्यकांत वरकड, राजाभाऊ शेळके, सचिन पाटील थोरवे,कृषीभूषण हनुमंत गावडे,डॉ. अनील गर्जे, गोंदकर,डॉ.हनुमंत काकडे,राष्ट्रीय खेळाडू बाळासाहेब शेंदूरकर,धानोरा, खुंटेफळ, सोलापूरवाडी ग्रामस्थ व परिसरातील नातेवाईक व मित्रमंडळी या सर्वांनी शिरीषभाऊ थोरवे यांचे अभिनंदन केले. शब्दगंध परिषदेने एका प्रामाणिक सामाजिक कार्यकर्त्यांला न्याय दिल्यामुळे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. -------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या