Ticker

6/recent/ticker-posts

सरपंच संतोष देशमुख यांचं कार्य प्रेरणादायी म्हणून वैभवी देशमुखच्या हस्ते ध्वजारोहण ......... सरपंच पंडित पोकळे देशमुखच्या हस्ते चिंचाळा-राघापूर गावचा ध्वजारोहण ; सरपंच पंडित पोकळेंनी लाखो मराठ्यांचं मन जिंकलं!

आष्टी ( प्रतिनिधी) स्वातंत्र्यदिनानिमित्त आष्टी तालुक्यातील चिंचाळा -राघापूर गावच्या ध्वजारोहणाचे निमंत्रण स्व.संतोषअण्णा देशमुख यांच्या मुलीला देण्यात आले होते.ही चिंचाळा ग्रामस्थांसाठी अभिमानाची गोष्ट होती.वैभवी संतोष देशमुख हिनं ध्वजारोहणासाठी उपस्थित राहून चिंचाळा गावच्या अभिमानात भर टाकली आहे. खरंच संघर्ष आणि त्यातून मिळालेले यश हे खूप मोठं असतं तेच यश जेव्हा आपल्या गावी येते तेव्हा आनंद गगनात मावत नाही असंच काहीसं चित्र चिंचाळा गावांमध्ये पाहायला मिळालं. वैभवी देशमुख ला ध्वजारोहणाचा मान देऊन सरपंच पंडित पोकळे यांनी केलेलं काम हे गावासाठी अभिमानाचे आहेच पण महाराष्ट्रातील लाखो मराठ्यांसाठी देखील अभिमानाचे ठरले आहे.सरपंच पंडित पोकळे यांनी घेतलेल्या निर्णयाचं सर्वस्तरातून कौतुक केलं जात आहे.आष्टी तालुक्यातील चिंचाळा राघापूर गावच्या ध्वजारोहणासाठी १३ तारखेला गावातील ज्येष्ठ नागरिक भाऊसाहेब सत्यबापू पोकळे व सिद्धार्थ बाबा पोकळे यांच्या हस्ते तसेच १४ तारखेला ग्रामसेवक निशा जगताप व ग्रामपंचायतचे इतर सहकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले तर १५ ऑगस्ट रोजी स्वर्गीय संतोषअण्णा देशमुख यांच्या मुलीला निमंत्रित करण्यात आले होते. स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण वैभवी देशमुख यांच्या हस्ते करून गावातील गुणवंतांचा देखील गुणगौरव कार्यक्रम वैभवी देशमुख व धनंजयभैय्या देशमुख यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे वैभवी देशमुखने NEET परीक्षेमध्ये मिळवलेल्या यशाबद्दलही तिचाही ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.त्याचबरोबर राजू सुखदेव पोकळे फौजी, राजू वसंत पोकळे फौजी, वैभव बबन पोकळे तसेच डॉ.शुभांगी सोमीनाथ पोकळे तसेच पडद्यामागचे हिरो म्हणून ग्रामपंचायत चे कर्मचारी कायम उत्कृष्ट काम करणारे लक्ष्मण पोकळे, अविनाश पोकळे व संतोष पोकळे यांचा ही सत्कार मान्यवरांच्या हस्ते झाला. यावेळी गावचे सरपंच पंडित पोकळे, पोलीस पाटील गणपत पोकळे, उपसरपंच ज्ञानेश्वर पोकळे, ग्रा.पं.सदस्य बाळासाहेब पोकळे, ग्रा.पं.सदस्य अनिल पोकळे,ग्रा.पं.सदस्य भाऊसाहेब तांबे,ग्रा पं सदस्य बेबीताई पोकळे,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष भाऊसाहेब पोकळे,सेवा सह सो चे व्हा चेअरमन कृष्णा तांबे,माजी सरपंच दिगंबर पोकळे,राधाकिसन पोकळे,जालिंदर पोकळे, डॉ अशोक पोकळे,डॉ सोमनाथ पोकळे, सुखदेव तात्या, राजू पोकळे, अशोक पोकळे, डॉ साळुंके, गणेश पोकळे, सागर पोकळे,शिक्षक शिक्षिका, कर्मचारी,ग्रामस्थ व नागरिक उपस्थित होते कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे चिंचाळा/राघापूर गावासह परिसरातील नागरिकांचे सरपंच पंडित पोकळे यांनी आभार व्यक्त केले. देशमुख कुटुंबीयांच्या चालल्या न्याय हक्काच्या लढ्याला चिंचाळा गावचे शेवटपर्यंत सहकार्य व साथ असेल असाही शब्द सरपंच पंडित पोकळे यांनी यावेळी दिला. चौकट ----------- सरपंच संतोष देशमुख यांचं कार्य प्रेरणादायी म्हणून वैभवी देशमुख ध्वजारोहणासाठी ------------------- स्व.सरपंच संतोष देशमुख फक्त सरपंच नव्हते ते महाराष्ट्रातील सरपंचाला प्रेरणादायी उदाहरण होते. त्यांनी केलेलं कार्य खूप मोठं होतं.ते आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत.त्यांची झालेले निर्घुण हत्या ही निंदनीय आहेच आणि मानव जातीला काळिंबा फासणारी आहे. त्यांच्या पश्चात न्याय हक्कासाठी त्यांच्या मुलीने म्हणजे वैभवी ने केलेला संघर्ष हा खूप मोठा आहे त्यातून मिळालेले यश हे उल्लेखनीय आहे म्हणूनच वैभवी देशमुख हीच्या हस्ते हा ध्वजारोहण करण्यात आले. त्यांच्या हस्ते गुणवंतांचा सन्मान करण्यात आला.ही आमच्या गावासाठी अभिमानाची बाब आहे.या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या धनंजयभैय्या देशमुख आणि वैभवी संतोष देशमुख, सागर आप्पा धस यांचे आभार मानतो. ----- सरपंच पंडित पोकळे (सरपंच - चिंचाळा- राघापूर ग्रुप ग्रामपंचायत) -----------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या