Ticker

6/recent/ticker-posts

जन्मगाव रुईनालकोल येथे माजी आ.भीमराव धोंडे यांचा महेशाच्या चरणी अभिषेक व महापुजा ......... तिसऱ्या सोमवारी भाविकांची प्रचंड गर्दी;पवित्र भूमीत भक्तीचा मळा फुलला..

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी,पाटोदा,शिरूर मतदार संघाचे माजी आ.भीमराव धोंडे यांचे जन्मगाव असलेल्या महेशच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी अभिषेक आणि महापूजा करत आपला आध्यात्मिक वारसा जतन केला.माजी आ.भीमराव धोंडे प्रारंभीपासूनच आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अत्यंत तळमळीने संत महंतांच्या चरणी नतमस्तक होणारे व्यक्तिमत्त्व आहे. संत वामनभाऊ महाराज श्रीक्षेत्र गहिनीनाथगड येथे त्यांनी दोन अश्व तर रुईनालकोल देवस्थानला एक अश्व देवस्थानला अर्पण केला आहे. आपला आध्यात्मिक मोठेपणा या निमित्ताने सिद्ध केलेला होता.कृषी अध्यात्मिक,शिक्षण, समाजकारण,राजकारण आदीसह विविध क्षेत्रांमध्ये त्या समवेत चित्रपट आणि क्रीडा क्षेत्रात ही दमदार कामगिरी करणारे माजी आमदार भीमराव धोंडे एक बहुआयामी नेतृत्व आहे.आष्टी तालुक्यातील त्यांचे जन्मगाव असलेल्या पवित्र भूमीत माजी आ. भीमराव धोंडे तिसऱ्या सोमवारी आवर्जून उपस्थित झाले. येथील अत्यंत महत्त्वाचे देवस्थान असलेल्या महेशाच्या चरणी ते विनम्र नतमस्तक झाले. महापूजा आणि अभिषेक करून त्यांनी या देवस्थानचे मनोभावे आशीर्वाद घेतले. भीमराव धोंडे यांच्या समवेत यावेळी असंख्य कार्यकर्ते भाविक भक्त युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देवस्थानच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
चौकट --------- अध्यात्मसेवा हा आपला मूलभूत कर्तव्याचा भाग -------------------------------- महाराष्ट्र ही संतांची आणि वीरांची भूमी आहे. संत तुकाराम,संत एकनाथ महाराज, संत रामदास यासारख्या असं संत सज्जनांनी ही भूमी पवित्र केलेले आहे. समता, बंधुत्व, ऐक्य, सर्वधर्मसमभाव ही मूल्य संतांनी या भूमीत रुजवली म्हणूनच संतांच्या आणि देवस्थानच्या चरणी नतमस्तक होण्यात मला आनंद आणि समाधान लाभते अशी प्रतिक्रिया महाअभिषेक आणि पूजा केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना माजी आमदार भीमराव धोंडे यांनी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या