
आष्टी (प्रतिनिधी)
मनुष्याचे कुटुंब हे सर्व स्वास्थ्य जीवनाला योग्य ठिकाणी,योग्य
मार्गाने जाण्याचा धडा परिवार देत असतो आणि म्हणून ज्येष्ठांच्या संस्काराच्या
शिदोरीतून लहान मुलावर संस्कार घडत असतात. असे संस्कार आष्टी तालुक्यातील बोडखे
परिवारात घडले असून आजोबांची उत्कृष्ट सेवा मनोभावे करत नातवाने पाळलेला धर्म आणि
वडिलांनी केलेले संस्कार यातून बोडखे परिवाराने निर्माण केलेला आदर्श आष्टी
तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे. आष्टीचे माजी आमदार आणि शिक्षण महर्षी भीमराव
धोंडे असून त्यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेले पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय
आहे.या विद्यालयातून मोठमोठ्या पदावर विविध क्षेत्रात मान्यवरांनी आपले स्थान
निर्माण केलेले आहे.केवळ शिक्षणातील पदेच नाहीत तर संस्काराचे आदर्श निर्माण
करण्याचा या विद्या मंदिराचा एक वेगळा आदर्श आहे.याच पंडित नेहरू विद्यालयाचे
प्राचार्य तथा मुख्याध्यापक सुरेश बोडखे आणि प्रा. डाॕ.राम बोडखे यांचे वडील
गहिनीनाथ बोडखे सध्या ९५ वर्ष वयाच्या आहेत. बोडखे यांचे अत्यंत वृद्धावस्थेमध्ये
सेवा करण्याचे भाग्य मुख्याध्यापक सुरेश बोडखे यांना लाभले आहे.सकाळ दुपार
संध्याकाळ त्यांची मनोभावे सेवा करत चहा पाणी नाश्ता जेवण देण्याचे काम
त्यांच्याकडून होत आहे.प्राचार्य सुरेश बोडखे यांचे कर्तव्य परिसरात आदर्श मानले
जात आहे. मुख्याध्यापक सुरेश बोडखे यांनी निर्माण केलेले संस्कार त्यांचा मुलगा
आजोबांची सेवा करून पुढे नेताना दिसतो आहे. परिवारातील संस्कार चांगल्या परिवाराचे
लक्षण असते हे या निमित्ताने अधोरेखित झाले आहे. सातत्याने अस्थिरता... भारताच्या
कट्टर दुष्मनांची विविध स्तरावर व्यापक प्रमाणात समाजहिता विभागाची धोरणे...
त्यामुळे भीतीचे वातावरण अशा परिस्थितीत स्वतंत्र्याचा क्षण हा ज्येष्ठांसाठी
परमानंदाचा तर तरुणांसाठी तो स्वर्गीय क्षण होता! अशा शब्दात ज्येष्ठ नागरिक तथा
आपल्या वयाची ९५ पार केलेल्या गहिनीनाथ (नाना) बोडखे यांनी आठवणींना उजाळा
दिला.आष्टी आदर्श गाव तालुक्यातील सराटेवडगाव -आनंदवाडी हे तालुक्यातील कृषीविषयक
आवड असलेले आणि सर्व गुणांनी युक्त असे आदर्शगाव आहे.माजी सरपंच प्रा.डॉ.राम बोडखे
यांच्या संकल्पनेतून या गावच्या विकासासाठी अनेक योजना केल्या. गावची शिस्त, एकोपा
आणि गावच्या विकासासाठी सर्वांनी पुढे येणे या वैशिष्ट्यांनी या गावची परंपरा..अशा
आदर्श गावातील माजी चेअरमन गहिनीनाथ बोडखे हे ९५ वर्षाचे जेष्ठ नागरीक.. ते
भारताच्या स्वातंत्र्याचे साक्षीदार आहेत. तरुणांशी गप्पा मारताना ते सांगतात पं.
जवाहरलाल नेहरु यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील गुरव पिंपरी या गावी तलावाचे भुमीपुजन
कार्यक्रमास आले असताना आपण त्यांना जवळुन पाहिले. त्यांच्यासमवेत लहाण इंदिरा
गांधी होत्या हेही विशेष आठवण ते सांगतात.देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ते
अत्यंत तारुण्यात म्हणजे केवळ १५ वर्षांचे होते.ऐन उमेदीचा काळ असल्याने त्यांनी हा
क्रांतीकारिक क्षण स्वतः अनुभवल्याचे त्यांच्या बोलण्यातून दिसून आले.त्यांनी त्या
काळात अनुभव केलेले कार्य ऐकताना उपस्थितांच्या अंगावर अक्षरशः शहारे येत
होते.प्रत्येक तरुणांमध्ये भारत स्वतंत्र होईल या एकच अपेक्षेने प्रचंड चैतन्य
उत्स्फूर्तता निर्माण झाली होती.अंगात नवा जोश होता,नवी चेतना होती. स्वातंत्र्याची
पहाट येईल ही आशा होती आणि तो क्षण १५ आँगस्ट १९४७ रूपाने अवतरला आणि सबंध भारत
मातेच्या सुपुत्रांच्या चेहन्यावर आनंदाचे भाग्य उजळले. हे सांगताना त्यांचा
आत्मविश्वास प्रचंड दूनावला होता. ११ वर्षांचे गहिनीनाथनाना हे सराटेवडगाव
-आनंदवाडीचे माजी सरपंच प्रा.डॉ.राम बोडखे व पं.नेहरु विद्यालयाचे प्राचार्य तथा
मुख्याध्यापक सुरेश बोडखे यांचे वडील आहेत. यावेळी त्यांनी अनेक किस्से ऐकवले.त्या
काळामध्ये विहिरीमध्येमध्ये पोहणे,पहाटे मोट हाकणे,नांगरणी करणे,गवत कापणे,व्यायाम
करणे,दूध पिणे, भजन करणे,लग्न वरातीत सॉंग आणणे,लेझीम डाव खेळणे आदि आवडी,छंद
जोपासत समाजाच्या हिताच्या गोष्टी करत राष्ट्रधर्म हे आम्ही निभावत होतो. हे
त्यांनी प्रकर्षांने सांगितले. यावेळी जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,
इंजि.पी.बी.बोडखे,सेवानिवृत्त पीएसआय शेख अन्सारभाई, प्रा.डाॕ.जी.पी.बोडखे,माऊली
बोडखे, लक्ष्मणबुवा बोडखे, झुंबर बोडखे रामभाऊ बोडखे, सेवानिवृत प्राचार्य आदिनाथ
बोडखे, मुख्याध्यापक साईनाथ बोडखे, शिवाजी बोडखे,सौ. कौशाबाई झुंबर बोडखे,प्राचार्य
तथा मुख्याध्यापक सुरेश बोडखे आदि उपस्थित होते. उपस्थित होते. ----------------
चौकट --------- कुटुंबाचा संस्कारमय प्रवास गेल्या अनेक पिढ्यांचा!
------------------ गहिनीनाथ बोडखे (नाना) यांची जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांनी
भेट घेतली. यावेळी बोलताना मुख्याध्यापक सुरेश बोडखे म्हणाले की,गेल्या अनेक
पिढ्यांपासून आमच्या कुटुंबामध्ये प्रत्येकाचा आदरभाव करून ज्येष्ठांची सेवा
अखेरपर्यंत करणे ही सर्वांची रीत आहे. माझा मुलगा माझ्या वडिलांची म्हणजे त्याच्या
आजोबाची सेवा करतो. हा परिवाराचा अनेक पिढ्यांपासून चालेला सेवाधर्म आहे. हे विशेष
कार्य नसून केवळ कर्तव्य असल्याचेही ते म्हणाले.
-----------------
0 टिप्पण्या