Ticker

6/recent/ticker-posts

वृक्षरोपण करून पर्यावरणाचे रक्षण करावे ........... सरपंच सौ.वंदना परिवंत गायकवाड

आष्टी (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने “आपले क-हेवडगाव, हरित क-हेवडगाव ” या संकल्पनेतून वृक्षलागवड मोहिमेचा शुभारंभ क-हेवडगाव शहरातील येथे शाळा परिसर,रस्ते,वस्त्या व परिसरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या उपक्रमाचा शुभारंभ सरपंच तथा कडा कृ.उ.बा.समितीच्या संचालिका सौ.वंदना परिवंत गायकवाड यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. कार्यक्रमात सरपंच सौ.वंदना गायकवाड,भगवाननाना सांगळे यांनी स्वतः झाडे लावून मोहिमेत सहभाग नोंदवला. यावेळी जालिंदर खांडवे,अर्जुन बांगर,प्रवीण गायकवाड,प्रशांत बांगर,सलवार शेख,महेश सांगळे,शरद खांडवे,किरण गायकवाड,गणेश टकले,संजय गायकवाड,मल्हारी नागरगोजे, उर्मिला नागरगोजे,सुवर्णा गावडे,शिक्षीका रंजना सांगळे, मुख्याध्यापक बापु जायभाय सर,सरोदे सर,क-हेवडगाव येथील बचत गटातील महिला, युवक मंडळे, ग्रामपंचायत सदस्य,ग्रामपंचायत कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक,क-हेवडगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी सरपंच सौ.वंदना गायकवाड म्हणाल्या की, प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.वृक्षरोपण करून पर्यावरणाचे रक्षण करावे असे प्रतिपादन सरपंच सौ.वंदना परिवंत गायकवाड यांनी केले.हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र या संकल्पनेतून वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात येत असुन क-हेवडगाव येथील गावातील शाळा परिसर, ग्रामपंचायत हद्द,रस्त्याच्या कडेला, मंदिर परिसरात आणि इतर निवडक ठिकाणी अनेक प्रजातींची झाडे लावण्यात आली.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि पुढच्या पिढ्यांसाठी हिरवे स्वप्न घडवण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे.प्रत्येक नागरिकाने एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. या उपक्रमास सरपंच सौ.वंदना गायकवाड, ग्रामविकास अधिकारी दिपाली गायकवाड यांनी मार्गदर्शन केले." झाडे लावा, झाडे जगवा " हा संदेश घेऊन मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात आली. -------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या