Ticker

6/recent/ticker-posts

खा.बजरंग सोनवणे यांच्या संकल्पनेतून दिव्यांगासाठी साधने वाटप व पूर्व तपासणी नोंदणी शिबिर संपन्न ....... कृत्रिम अवयव सहाय्यभूत साधने मोफत वाटपासाठी पूर्व तपासणी व नोंदणी शिबिरात ९०० गरजुंनी घेतला सहभाग

आष्टी (प्रतिनिधी) बीड जिल्ह्याचे खासदार बजरंगबप्पा सोनवणे यांच्या संकल्पनेतून येडेश्वरी फाऊंडेशन व बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष) दिव्यांग सेल यांच्या संयुक्त विद्यमाने आष्टी येथे दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी कृत्रिम अवयव सहाय्यभूत साधने मोफत वाटपासाठी पूर्व तपासणी व नोंदणी शिबिर शुक्रवारी घेण्यात आले.या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद देत ९०० दिव्यांग व जेष्ठ नागरीकांनी सहभाग घेतला.या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राष्ट्रवादी प्रदेश युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख,राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आण्णासाहेब चौधरी,बीड जि.प.चे माजी अध्यक्ष डॉ. शिवाजी राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक तालुकाध्यक्ष विजय गाढवे,रिजवान भाई शेख,भुसारी साहेब (केज),गटविकास अधिकारी गोकुळ बागलाने,माजी शिक्षणाधिकारी विक्रम पोकळे, समाजसेवक अशोक पोकळे,
डॉ.संतोष ,काकडे , जाधव, आरोग्य दूत रामेश्वर गवळी,शिरिषभाऊ थोरवे,राजेंद्र लाड,संदीप जगदाळे,सोनू तळेकर,सुरेश पवार,राजकुमार थेटे,राम खिळे आदी उपस्थित होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख म्हणाले की,खासदार बजरंगबप्पा सोनवणे यांनी चांगला उपक्रम राबवला आहे. हा उपक्रम दिव्यांग बांधवांसाठी स्तुत्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. बीड जि.प.चे माजी अध्यक्ष डॉ.शिवाजी राऊत म्हणाले की,खासदार बजरंगबप्पा यांनी चांगला उपक्रम राबवला आहे. या शिबिराचा दिव्यांग बांधवांना फायदा होणार असल्याचे सांगितले.ज्येष्ठ नेते अण्णासाहेब चौधरी म्हणाले की,यापुढे असे शिबिर आहेत परंतु गाव खेड्यातील प्रत्येक दिव्यांग बांधवांपर्यंत या शिबिराची माहिती पोहोचविण्यासाठी ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांनी संबंधित दिव्यांग बांधवांना शिबीराबद्दल माहिती देऊन इथपर्यंत आणण्याची जबाबदारी घ्यावी असे आवाहन केले.आष्टीचे गटविकास अधिकारी गोकुळ बागलाने म्हणाले की,५ टक्के दिव्यांगांचा निधी लवकरच वाटप करून व दिव्यांग बांधवांना कॅम्पबद्दल पूर्वकल्पना देऊन माहिती देण्यासाठी ग्रामसेवक यांना सुचित करण्यात येईल.राष्ट्रवादी दि काँग्रेस दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.संतोष काकडे म्हणाले की, खासदार बजरंगबप्पा सोनवणे यांच्या संकल्पनेतून दिव्यांग सेलच्यावतीने दिव्यांग बांधवांसाठी हा स्तुत्य उपक्रम राबवला आहे. पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावरील ५ टक्के दिव्यांग निधी वाटप करण्यात यावा अशी मागणी केली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन युवा नेते महादेव डोके यांनी केले.दिव्यांग सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार पक्ष) बीड जिल्हाध्यक्ष डाॕ.संतोष काकडे यांनी उपस्थितीतांचे आभार मानले. - ------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या