ठाणे (प्रतिनिधी )
लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या संघर्षात मी सावलीसारखा
उभा होतो.स्व.मुंडें साहेबांना दूरदृष्टी होती म्हणूनच एका मंत्रिमंडळात दोघे
बहीण-भाऊ झालो हे सांगत स्व. मुंडेसाहेब दुर्दैवाने आपल्यातून गेले. त्याचे प्रचंड
दुःख आणि वेदना असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले,मुंडे साहेबांनी प्रचंड कार्य
केले.गोपीनाथ मुंडे आणि स्व. पंडितआण्णा मुंडे यांनी कधीच जातीचे राजकारण शिकवले
नाही हे स्पष्ट करत मात्र ज्या समाजात जन्मालात त्या समाजाचा अभिमान मात्र असलाच
पाहिजे अशी भूमिका मांडत वंजारी समाज हा शांत,संयमी, अभ्यासू,कणखर, बुद्धिमान आहे.
त्यामुळेच ओपन संवर्गातून शेकडो मुले विविध विभागांमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करतात
असा गौरव करत विविध क्षेत्रातील आणि विभागातील गुणवंतांचे त्यांनी अभिनंदन केले.
आणि विविध बाबींवर मुक्तपणे आपले मत व्यक्त करत "झुक झुक कर खडा हूं मै,अब झुकणे का
शौक नही,अब हमे मिटने का खौप नही!" अशा हिंदी शेर शायरीमध्ये महाराष्ट्राच्या
कानाकोपऱ्यातून प्रचंड संख्येने आलेल्या सकल वंजारी समाज बांधवांमध्ये प्रचंड
चैतन्य निर्माण केले. या भाषणाला सभागृहातून टाळ्या आणि आवाजाने समाज बांधवांनी
प्रतिसाद दिला. आज रविवारी दि.२७ जुलै रोजी ठाणे येथे अखिल भारतीय सकल वंजारी समाज
बांधवांच्यावतीने समाजातील विविध विभागामध्ये नावलौकिक कमावलेल्या गुणवंतांचा
मान्यवरांच्या हस्ते आणि उपस्थितीत गौरव करण्यात आला.यावेळी उद्घाटक म्हणून
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आ. धनंजय मुंडे बोलत होते.अध्यक्षस्थानी
जगद्विख्यात नेत्रतज्ञ डॉ.तात्यासाहेब लहाने होते.यावेळी माजी आ.संजय
दौंड,ह.भ.प.सुदाम महाराज पानेगावकर, ह.भ.प.राधाताई सानप महाराज,प्रा. सुशीलाताई
मोराळे आदि उपस्थित होते. माजी मंत्री आ. धनंजय मुंडे म्हणाले की, विविध क्षेत्रात
अत्यंत कष्टाने कर्तबगारिका अजून यशवंत ठरलेल्या समाज बांधवांचे मी मनापासून
अभिनंदन करतो. पुणे, संभाजीनगर येथे स्वतःच्या हिमतीवर आपण एमपीएससी आणि यूपीएससीचा
अभ्यास करणाऱ्या समाज युवकांसाठी आपण तशी व्यवस्था रचना करू असे सांगून आपल्या
विषयी कोणाला काय बोलायचे ते बोलू द्या फक्त थोडं शांत बसत जा असा संदेशही त्यांनी
यावेळी दिला. आपला समाज अल्प आहे याची जाणीव करत आपण 'वंचित' मधले 'किंचित'
असल्याचे सांगून आपल्या कष्टातून घामातून मोठ्या पदावर जाताना काहींना 'किंचित'
त्रास होणारच हे अशी मिस्कील टिपणी करत आपल्या समाज बांधवांच्या बिंदुनामावलीवर बोट
दाखवाल तर खैर नाही..! असा थेट इशारा मुंडे यांनी यावेळी दिला. गुणवंतांनी
स्वतःच्या ताकदीवर यश मिळवले आहे. आपला द्वेष कोणीही करू द्या;आपण मात्र कोणाचा
द्वेष करायचा नाही ही वडीलकिची भावना व्यक्त करत वंजारी समाजाचे रक्त गरम आहे पण
कधी गरम व कधी नरम करायचे हे ठरवत जा.संकटात माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे
राहिलात.संघर्ष आहे विजय अभी बाकी आहे.. हा वेध देत त्यांनी जी क्रिया केलीच नाही
त्यावर प्रतिक्रिया कशाबद्दल? असा प्रश्न उपस्थित करत माझं सगळं काढलं पण संयम
ठेवला. कृषी विभागात न्यायालयात कट कारस्थान केले पण न्यायदेवतेने त्यांना एक
लाखाचा दंड केला हा धागा पकडत आ.धनंजय मुंडे यांनी 'सत्य परेशान हो सकता है लेकिन
पराजित नाही!' हा शेर पेश केला.
प्रारब्ध देवालाही चुकले नाही!
----------------
आपल्यावरील दोनशे दिवस चालवलेल्या मीडिया ट्रायलबद्दल त्यांनी प्रचंड दुःख आणि खंत
व्यक्त केली. नियत चांगली असल्यास नियती साथ देतेच हे त्यांनी यावेळी ठासून
सांगितले. "नये सफर मे खामोसी को अपणा या मैने; क्योंकि बिना गलती के बहुत कुछ सुना
है मैने! -----------------
समाजातील गरजू गरीब हुशार मुलांना मदत करा श्रीक्षेत्र
भगवान गडावर श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावर संत भगवान बाबा संत वामनभाऊंच्या
आशीर्वादाने मुलांसाठी शैक्षणिक कार्य सुरू आहे. याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत
ठाणे येथे आज झालेला समाज बांधवांचा गुणवंतांचा मेळावा हा कार्यक्रम अखंडित सुरू
ठेवा असे आवाहन केले. या वंजारी समाज बांधवांच्या गुणवंतांच्या सत्कार समारंभाच्या
कार्यक्रमात नगराध्यक्ष राहुलभैय्या केंद्रे, धुळ्याचे महापौर करपे,जळगाव येथील
राजेंद्र घुगे पाटील,अंतरकर प्रा. सुशिलाताई मोराळे,माजी आ. संजयभाऊ दौंड,
ह.भ.प.राधाताई सानप,वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी संजय दराडे यांची भाषणे झाली.


विविध
क्षेत्रातील गुणवंतांचा समाजभूषण
पुरस्काराने गौरव!
-----------------
अश्विन
महाजन, रेश्मा बोडके,सागर आव्हाड,सचिन बडे, विशाल बडे, श्रद्धा मिलिंद गीते,
महेशकुमार वनवे, सुजित चौरे,सुचिता चाटे,अलकनंदा घुगे, गणेश खांडे,प्रवीण
गिते,डॉ.सुदाम महाराज पानेगावकर,रेणुका घुले प्रसाद गीते मच्छिंद्र सांगळे, कावेरी
बांगर,गणेश राख,विठ्ठल कांगणे, अभिषेक चकोर, धनश्री गणपत घुगे, सोनी सानप, डॉ.
उज्ज्वला दहिफळे, पार्थ पालवे, भागवतराव खाडे, अरुणनाना खरमाटे, संतोष खाडे,फुलचंद
चाटे,मानवेंद्र केंद्रे, कश्मीरा संख्ये, धनंजय बांगर, वर्ष बांगर,प्रवीण सांगळे,
सत्यजित हंगे,डॉ. बाळासाहेब सानप, डॉ.शितल चौगुले, साक्षी अशोक बांगर, ओम रवींद्र
काकड, सोनाली खरमाटे, सोनल तांदळे आदीसह पत्रकारिता, सामाजिक, शैक्षणिक,धार्मिक,
वैचारिक,उद्योग अशा विविध क्षेत्रातील गुणवत्ता प्राप्त गुणवंतांचा समाज भूषण
पुरस्कार देऊन माजी मंत्री आ. धनंजय मुंडे आणि प्रख्यात नेतृत्व डॉ.तात्याराव लहाने
यांच्या हस्ते सन्मानपत्र देत समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात आला. धनराजभाऊ
गट्टे यांच्या सुरेख नियोजनाचे कौतुक
---------------
वंजारी समाज बांधवांच्यावतीने
समाज भूषण पुरस्काराचा गौरव सोहळा अधिवेशन आणि गुणगौरव कार्यक्रम वंजारी समाज
संघटनेचे धनराजभाऊ गुट्टे यांनी अत्यंत परिश्रम पूर्वक आणि यशस्वी केल्याबद्दल
उपस्थित मान्यवरांनी आणि समाज बांधवांनी त्यांचे मनापासून कौतुक केले.यावेळी
प्रस्ताविकात त्यांनी वंजारी समाजाचा कर्तबगारीचा इतिहास सांगितला. हा वंजारी
समाजाचा मेळावा राज्यभर गाजेल असा विश्वास व्यक्त करत नेतृत्वाचा गुण तर समाजाला
देवाने दिलाय असे सांगून त्यांनी वंजारी समाज बांधवांच्या कल्याणकारी धोरणासाठी
पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा केली.
-------------------
चौकट
--------
वंजारी समाज
प्रचंड धाडसी, कष्टाळू,
पराक्रमी आणि बुद्धिमान!
-----------------
महाराष्ट्रात
वंजारी समाज अल्प आहे परंतु तो प्रचंड बुद्धिमान कर्तबगार पराक्रमी ध्येयवादी आणि
कष्ट करणारा समुदाय आहे प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक काळातील या समाजाने
राष्ट्रहितासाठी योगदान दिल्याचे अनेक दाखले यावेळी माजी मंत्री आ.धनंजय मुंडे,
प्रा.सुशीलाताई मोराळे,धनराज भाऊ गुट्टे यांच्यासह अनेक मान्यवर वाक्यांनी दिले.
राज्यभरातून समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. -------------------
0 टिप्पण्या