Ticker

6/recent/ticker-posts

विस्तार अधिकारी सुरेश पवार व प्रमोद तावरे यांचा आज सेवापुर्ती गौरव सोहळा

आष्टी (प्रतिनिधी) आष्टीचे गटशिक्षण अधिकारी कार्यालयातील शिक्षण विस्तार अधिकारी सुरेश पवार व शिदेवाडीचे मुख्याध्यापक प्रमोद तावरे यांचा आज रविवार दि.२७ जुलै रोजी सकाळी १०.३० मोरेश्वर मंगल कार्यालयात सेवापुर्ती गौरव सोहळा होणार आहे. कार्यक्रमास अध्यक्षस्थानी माजी मंत्री आ.सुरेश धस हे राहणार आहेत. यावेळी ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल व म.रा.प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे यांची मुख्य उपस्थिती लाभणार आहे.नियतवयोमाना नुसार कडा येथील स्वामी विवेकानंद शिक्षकांची सह. पतसंस्थेचे माजी चेअरमन तथा आदर्श शिक्षक सुरेश पवार व शिदेवाडी जि.प. प्राथमिक शाळेचे आदर्श मुख्याध्यापक प्रमोद तावरे हे सेवानिवृत होत आहेत.या सेवापूर्ती सोहळ्यास आदर्श शिक्षक सुरेश पवार हे अत्यंत शिस्तप्रिय व कामाशी प्रामाणिक, विद्यार्थ्यांविषयी तळमळ असणारे हे शिक्षक आहेत. बीड जि.प. मध्ये सलग ३१ वर्ष सेवा करून आज त्यांचा सेवापूर्ती सोहळा होत आहे.शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक आहे.भविष्यातले विचारवंत, कलाकार,लेखक, तत्त्वज्ञ,पुढारी, डॉक्टर,प्राध्यापक, इंजिनीयर,शास्त्रज्ञ, पत्रकार तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते. ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन त्यापासून एखादी प्रतिकृती तयार करत असतो,अगदी त्याचप्रमाणे शिक्षक बालकांच्या कोर्‍या मनावर योग्य संस्कार करून त्यातून भविष्यातील जबाबदार नागरिक घडवित असतात. आपल्या आई वडीलांनंतर शिक्षक हे आपले अप्रत्यक्षरित्या पालकच असतात. शिक्षक हे आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान शिकवित नाहीत तर आपण त्यांच्याकडून जगण्याची कला आत्मसात करत असतो.आपल्या व्यक्तीमत्त्वावर त्यांच्याकडून संस्कार,संस्कृती, परंपरा,चालीरिती व आदर असे पैलू पाडले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी‍ आपल्या गुरूंचा नेहमी आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे.शाळा सोडून गेलेल्या माजी विद्यार्थ्यांशीही पवार सर आजही तेवढ्याच उत्सुकतेने व प्रेमाने बोलून ख्यालीखुशाली विचारतात सतत हसरा चेहरा,आरोग्य विषयी सतत मार्गदर्शन करणे हे त्यांच्या स्वभावातच आहे. कुठेही भेटलेले तरीही तर आजही आरोग्यविषयक काळजी घे किंवा आरोग्य विषयीच्या टीप्स विज्ञानातील विषयाप्रमाणे देत असतात कुठल्याही विद्यार्थ्यांना भेदभाव न करता किंवा गरीब-श्रीमंत न बघता आजही ते तेवढ्याच प्रेमाने सर्वांशी बोलतात वागतात.आज रविवारी होणाऱ्या या कार्यक्रमास माजी उपसभापती देविदास धस,माजी शिक्षण सभापती उध्दव दरेकर,संजय गाढवे,माजी गटशिक्षण अधिकारी सुधाकर यादव,जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मनोज धस, गटशिक्षण अधिकारी श्रीमती सिमा काळे,जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मोहन काकडे,स्वामी विवेकानंद शिक्षकांची सह. पतसंस्थेचे चेअरमन मारुती पठाडे, व्हाईस चेअरमन अशोक लटपटे, सचिव महेशकुमार शिंदे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहे.या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केंद्रप्रमुख त्रिबंक दिंडे,सर्व घटक शाळा मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद के.प्रा. शा.आष्टी नं.१ अध्यक्ष,उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती के.प्रा.शा. आष्टी नं.१ आणि प्रा.शा.शिदेवाडी यांनी केले आहे. दोन्ही सत्कार मुर्तीनी हार-तुरे, फेटा,शाल स्विकारायचे नाहीत असा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. प्रेमाखातर पुस्तक स्विकारले जाणार आहेत. -------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या