
आष्टी (प्रतिनिधी) बीड जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या
अधिपत्याखालील बीड जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनची नुतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर
झाली आहे.जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात ही एक महत्त्वाची घडामोड ठरली आहे.या नव्या
कार्यकारिणीत आष्टीचे आ.सुरेश धस यांची जिल्हाध्यक्षपदी,राष्ट्रीय खेळाडू अविशांत
कुमकर यांची उपाध्यक्षपदी,तर आष्टीचे जेष्ठ पत्रकार अनंत हंबर्डे यांचे नातु तर
पाटोद्याचे प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक डॉ.सुशील तांबे यांची सचिवपदी निवड झाली
आहे. याशिवाय कोषाध्यक्ष म्हणून अशोक चौरे यांचीही सर्वानुमते निवड करण्यात आली
आहे.ही निवड बीड येथे पार पडलेल्या एका विशेष बैठकीत करण्यात आली.या बैठकीस भारतीय
टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कन्हैयालाल गुजर आणि सचिव मिनाक्षी गिरी यांनी
मार्गदर्शन केले.त्यांच्या उपस्थितीत ही कार्यकारणी अधिकृतपणे घोषित करण्यात आली.
सर्वांगीण विकासाचा निर्धार
-------------------
नवनियुक्त जिल्हाध्यक्ष आ. सुरेश
धस यांनी यावेळी सांगितले की,बीड जिल्ह्यातील टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंना राज्य
आणि देशपातळीवर संधी मिळावी यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कार्य केले जाईल. प्रत्येक
तालुक्यात लीग पद्धतीने स्पर्धा घेऊन नवोदित खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून
देण्याचा आमचा प्रयत्न असेल. उपाध्यक्ष व सचिवांकडूनही भक्कम समर्थन अविशांत कुमकर
म्हणाले की,स्वतः राष्ट्रीय स्तरावर खेळल्याने मैदानावरील गरजा समजतात. आता त्या
गरजांना व्यवस्थापनाच्या पातळीवर उत्तर देण्याची जबाबदारी आम्ही घेणार आहोत.डॉ.
सुशील तांबे यांनीही सांगितले की,ग्रामविकासाच्या धर्तीवर खेळ विकास’या संकल्पनेतून
गावपातळीवरही स्पर्धा व प्रशिक्षण शिबिरे घेण्याची योजना आहे.
कार्यकारिणीच्या
नियुक्तीचे सर्वत्र स्वागत
------------------
या नव्या कार्यकारिणीमुळे बीड
जिल्ह्यातील टेनिस क्रिकेट चळवळेला अधिक गती मिळेल असा विश्वास क्रीडा प्रेमींनी
व्यक्त केला आहे.अनेक तालुक्यांतील खेळाडूंनी आणि प्रशिक्षकांनी या निर्णयाचे
स्वागत करत नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या