Ticker

6/recent/ticker-posts

राज्य अपंग कर्मचारी संघटनेची राज्यस्तरीय सभा शिर्डीत ........... जिल्ह्यातील सर्व सदस्यांनी उपस्थित राहण्याचे राजेंद्र लाड यांचे आवाहन

आष्टी (प्रतिनिधी) रविवार दि. १३ जुलै २०२५ रोजी सप्तपदी मंगल कार्यालय, साईनगरी शिर्डी येथे सकाळी १० वाजता शासनमान्य महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना मुंबई -३२ ची राज्यस्तरीय सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे.या महत्वपूर्ण सभेस राज्यातील सर्व दिव्यांग कर्मचारी व अधिकाऱ्यांनी मतभेद विसरून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेचे प्रमुख पदाधिकारी दिगंबर घाडगे पाटील, परमेश्वर बाबर,रवींद्र पाटील आणि साईनाथ पवार यांनी केले आहे. दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी संघटना सातत्याने संघर्ष करत असून, अनेक प्रलंबित प्रश्नांबाबत शासन स्तरावर प्रभावी पाठपुरावा केला जात आहे. विशेष वाहतूक भत्ता, पदोन्नती, सहाय्यक तंत्रज्ञान साधने आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांना मिळावा यासाठी संघटना ठोस प्रयत्न करत आहे. संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात सर्व जिल्हावार ऑनलाईन सभा घेण्यात येत असून, त्या सभांना मोठ्या प्रमाणात संघटनेच्या सर्व सदस्यांचा प्रतिसाद मिळत आहे.या उपक्रमामुळे दिव्यांग कर्मचाऱ्यांमध्ये एकजूट निर्माण झाली असून, संघटनेने याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. या ऑनलाईन व प्रत्यक्ष सभांना मार्गदर्शन करण्यासाठी दिगंबर घाडगे पाटील, परमेश्वर बाबर, रवींद्र पाटील,साईनाथ पवार तसेच हणुमंतराव अवघडे हे पदाधिकारी सदैव पुढे आहेत. दिव्यांग कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी हा महत्वपूर्ण टप्पा असून,शिर्डी येथील सर्वसाधारण सभेला उपस्थित राहून संघटनेच्या संघर्षात सहभागी होण्याचे आवाहन दिगंबर घाडगे पाटील, परमेश्वर बाबर साहेब, रवींद्र पाटील, साईनाथ पवार यांनी केले आहे. सर्वांच्या सहमतीने गटतट, मतभेद विसरून लोकशाही पद्धतीने नविन राज्य कार्यकारिणी गठीत करण्यात येणार आहे. संघटनेचे बळ, शक्ती म्हणजे आपली एकी होय. म्हणून बीड जिल्ह्यातील संघटनेच्या सर्व सभासद बंधू - भगिनींनी कोणतेही कारण न सांगता मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अशोक आठवले, महादेव सरवदे, खतीब विश्वास, श्यामसुंदर दासरे, अतुल मिटकरी, सानप जे. डी., मदन लांडगे, आर. पी. शिंदे, अनिल किर्दत, गहिनीनाथ गिते, बिबन शेख, वैजिनाथ आघाव, बारगजे सर, घोलप सर, वाघमारे सर, प्रकाश ननवरे, सुभाष घोळवे, युवराज हिरवे, दिनकर खोमणे, श्रीहरी नागरगोजे, राजेंद्र लाड, आजिनाथ हाडुळे, इंद्रजित डांगे, अर्जुन बडे, बाळासाहेब सोनसळे, बाळासाहेब कांबळे, पांडूरंग उनवणे, गणेश बहिर, मधुकर अंबाड, नंदकुमार मोरे, कचरु चांभारे, द. ल. वारे, गोविंद वायकर, जायभाये साहेब, कु. सुरेखा खेडकर, श्रीम. वैशाली कुलकर्णी, कु. सविता ढाकणे, श्रीम. मंदा सारुक, कु. तांदळे मँडम, श्रीम. सुनिता जगताप, श्रीम. मुंडे संजिवनी, श्रीम. रोहिणी पवार, श्रीम. सुशिला झिंजुर्के, नवनाथ लोंढे, दत्तात्रय गाडेकर, सखाराम बेदरे, शेषराव सानप, राजू शेख, सिद्धेश्वर शेंडगे, अविनाश कोकाटे, ज्ञानेश्वर पालवे, जानदेव मुटकुळे, मच्छिंद्र राख, गहिनीनाथ शिरसाठ, सल्लाउद्दीन सय्यद, रविंद्र हुमे, देविदास भवर, सुभाष विघ्ने, नितीन आघाव, एकनाथ आव्हाड, शिवाजी कर्डिले, भगवान कांबळे, फुलचंद खाडे, प्रदिप काकडे, उद्धव जायभाये, दत्तात्रय दुधाळ, ममताजी गायकवाड, श्रीराम जगताप, रमेश बन्सोडे, पी. के. दराडे, तुषार पवार, विष्णू शिरसाठ, पोपट डहाळे आदींनी केले आहे अशी माहिती बीड जिल्ह्यातील दिव्यांग कर्मचारी जनहितार्थ राजेंद्र लाड यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या