
पंढरपूर (प्रतिनिधी)
लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भावीक फक्त पंढरपूरच्या पवित्र भूमीत एकवटले आहेत.चंद्रभागेचे स्नान करून ही भाविक मंडळी विठ्ठलाच्या नामस्मरणात नाहून निघत नतमस्तक होऊन ऊर्जा घेताना दिसत आहेत. दरम्यान याच पवित्र पंढरी नगरित बीड जिल्ह्याचे नामांकित पत्रकार उत्तम बोडखे हे कुटुंबासह दर्शनासाठी गेल्यानंतर पंढरपूर येथील संत मदन महाराज मठ येथे मठाधिपती ह.भ.प बबन महाराज बहिरवाल यांच्या हस्ते त्यांच्या लेखणीच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्यात आला.पवित्र आषाढी एकादशीच्या अत्यंत महत्त्वाच्या पवित्रतेने हा झालेला सन्मान बोडखे परिवारासाठी अत्यंत मोठी बाब ठरली आहे.पंढरपूरच्या पवित्र विठ्ठलाच्या दर्शनासाठी बीड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त दिंडीसह पोहोचले आहेत. राष्ट्रसंत भगवानबाबांच्या श्रीक्षेत्र भगवानगडावरील दिंडी सोहळा तसेच तीर्थक्षेत्र गहीनाथ गडावरील संत वामनभाऊ महाराजांचा पायी दिंडी सोहळा हजारो भाविक भक्तांच्या सह पंढरीत विसावला आहे. विठुरायाच्या या साजऱ्या गोजऱ्या रूपाची आस लागलेला हा भक्तगण आज अत्यंत समाधानी चेहऱ्याने टाळ मृदंगाच्या आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात आनंदी मनाने दिसून आला.आष्टी येथील ज्येष्ठ पत्रकार आणि उपसंपादक उत्तम बोडखे यांच्या घराण्याची अनेक वर्षाची आषाढी पंढरपूरच्या वारीची परंपरा आहे म्हणूनच बोडखे परिवारातील पत्रकार उत्तम बोडखे त्यांच्या सहचारिणी सौ, बबीताताई बोडखे आणि इतर सदस्य विठुरायाच्या दर्शनानंतर अत्यंत समाधानी मुद्रेत दिसून आले.दरम्यान हा संत मदन महाराज मठामध्ये मठाधिपती हा.भ.प.बबन महाराज बहिरवाल यांनी केलेला हा सत्कार या पवित्र भुमीत अत्यंत लाखमोलाचा असल्याची विनम्र भावना यावेळी बोडखे परिवाराच्या वतीने सौ.बबीता बोडखे यांनी व्यक्त केली.यावेळी
पांडुतात्या झिंजुर्के, दादा महाराज चांगुणे,ह.भ.प. योगीताताई हजारे महाराज, सुदामकाका झिंजुर्के,सुभाष महाराज सोनवणे, माऊली महाराज आव्हाड,संपतदादा सांगळे,माजी सभापती संजयनाना ढोबळे,सुनिल देशमुख, स्वनिल महाराज,बंडु शिंदे,वसंतदादा मोरे,महादेव मोरे,परमेश्वर कर्डीले,रोहिदास कर्डीले,आबा गांगर्डे,अरुण पडोळे, रामदास औटे, शेवराव ढवळे, भाऊसाहेब कर्डीले, संतोषकाका भंडारी, परसराम परकाळे, राजेंद्र शिंदे,लक्ष्मण खिळे,बबन चौधरी, तात्यासाहेब कर्डीले, विश्वनाथ चांगुणे, योगेश महाराज कापरे,बाळासाहेब मोरे,महेश बहिरवाल,नामदेव गायकवाड, भक्तराज देवडे, ताराचंद पांडुळे, सुनिल जाधव,कृष्णा महाराज बहिरवाल आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी संतोषकाका भंडारी व कर्डीले यांचाही वाढदिवसानिमित्त ह.भ.प.बबन महाराज यांनी सत्कार करुन आशीर्वाद दिले.
संत मदन महाराज पायी दिंडी सोहळ्यास आ. सुरेश धस,माजी आ.भीमसेन धोंडे,उद्योगपती परमेश्वर येवले, आण्णासाहेब चौधरी आदिंनी भेटी दिल्या.
----------------
चौकट
---------
टाळ मृदंगाच्या भक्तीमय
गजरात पंढरी दुमदुमली!
-------------------
पंढरपूरपासून चोही बाजूने चार किलोमीटर अंतरावर भक्तांचा महापूर दिसून आला. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून तसेच वाडी वस्तीवर असते आणि खेड्यापासून आलेले हे विठुरायाचे भक्त अत्यंत भोळ्या भावाने विठुरायाचे दर्शन घेऊन समाधानी चेहऱ्याने एकरूप झालेले दिसून आले. हा पवित्र अध्यात्मिक सोहळा याची डोळा पाहण्याची संधी मिळाल्याबद्दल बोडखे परिवाराने समाधान व्यक्त केले.
------------------
0 टिप्पण्या