
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी शहरामधील आनंद शैक्षणिक संकुलातील विविध महाविद्यालयांच्या विविध क्षेत्रातील संपादित माहिती पुस्तिकेचे प्रकाशन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विजय फुलारी यांच्या हस्ते आज येथे करण्यात आले. दरम्यान, ग्रामीण भागामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या माध्यमातून विकास केला आहे. तो अत्यंत स्तुत्य असून सर्वसामान्यांच्या स्वावलंबी जीवनाचा तो एक मार्ग असल्याचे कौतुक यावेळी करण्यात आले.आष्टी शहरातील आनंद शैक्षणिक संकुलातील महाविद्यालयांच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थाध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे,सौ.दमयंतीताई भीमराव धोंडे, सिनेट सदस्य डाॕ. अजय धोंडे,डाॕ. संतोष आडाकूल, दैनिक झुंजारनेताचे उपसंपादक उत्तम बोडखे,माजी शिक्षण सभापती नियामत बेग, संस्थाध्यक्ष किशोरनाना हंबर्डे,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सतीषआबा शिंदे,विजयशेठ मेहेर,चेअरमन राजेंद्र धोंडे,कडा बाजार समितीचे जेष्ठ संचालक सुखलाल मुथा,ॲड.रत्नदीप निकाळजे, रिपाइं तालुकाध्यक्ष अशोक साळवे,प्रशासन अधिकारी डॉ.डी. बी.राऊत,छत्रपती शाहु,फुले,आंबेडकर कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम आरसुळ उपस्थित होते.शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ आष्टी अंतर्गत आष्टीच्या गंगाईनगर मुर्शदपुर येथील आनंद शैक्षणिक संकुलातील अत्यंत पवित्र शैक्षणिक मंचावर कर्मचारी शैक्षणिक सहविचार सभा २०२५ संपन्न झाली. यावेळी मंचावर शिक्षण क्षेत्रातील मान्यवर कर्तव्यदक्ष आणि उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते. या महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांची अत्यंत व्यवस्थित संकलित माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते पार पडले.दरम्यान या माहिती पुस्तिकेचे सर्व मंचावरील मान्यवरांनी कौतुक करत संपादक आणि या क्षेत्रामध्ये सहभागी असलेल्या सर्व गुणीजनांचे यावेळी कौतुक करण्यात आले.
-----------
चौकट
--------
माजी आमदार भीमराव धोंडे
यांची जिद्द,चिकाटी आणि ध्येयवादाची परिपुर्ती!
-----------------
शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून माजी आमदार भीमराव धोंडे यांनी आष्टी, पाटोदा,शिरुर तालुक्यात शैक्षणिक क्रांती केली आहे. गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणातून स्वावलंबी जीवनाचे धडे दिले.बोलके नाही तर करते सुधारक म्हणून धोंडेंचे ग्रामीण भागासह सर्वत्र कौतुक होते. आज आनंद शैक्षणिक संकुलाच्या मंचावर शैक्षणिक,कृषी, सामाजिक,व्यापार, राजकीय,वैचारिक, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी धोंडे यांच्या या दूरदृष्टीला विशेष धन्यवाद दिले.
-----------------
0 टिप्पण्या