Ticker

6/recent/ticker-posts

गोंधळी समाज लोक कलावंत मेळावा संपन्न

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी शहरातील गोंधळी समाजाच्या वतीने परंपरागत असलेल्या गोंधळी समाज कलावंत मेळावा याही वर्षी मोठ्या आनंदात उत्साहात साजरा करण्यात आला आषाढ महिन्यातील गुरुपौर्णिमानंतर आष्टी जिल्हा बीड या ठिकाणी लोककलावंत मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असून आषाढ महोत्सव या नावाने या मेळाव्यात महाराष्ट्रातील अनेक नामवंत कलावंत लोककलावंत शाहीर या कलावंत मेळाव्यासाठी उपस्थित असतात याही वर्षी महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, सातारा, संभाजीनगर, धुळे, धाराशिव,तुळजापूर, पुणे, संभाजीनगर,बीड, दौंन्ड आदी ठिकाणाहून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील तालुक्यातील लोककलावंत उपस्थित असतात या महोत्सवाचे स्वरूप सकाळी कुलदैवत लक्ष्मी देवीची स्थापना सायंकाळी महापूजा व भोजन आणि त्यानंतर रात्री नऊ वाजता लोककरावंतांचा मेळावा आणि लोककरावंतांचे सादरीकरण या महोत्सामध्ये केले जाते.वृध्द कलावंतांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्याचे आयोजनाची परंपरा सुमारे दोनशे वर्ष हून अधिक काळापासून चालत आलेली गोंधळी समाजाची आषाढ महोत्सव लोककलावंतांचा मेळावा याही वर्षी मोठ्या उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला. स्थानिक गोंधळी कलावंतांच्यावतीने पुढच्या वर्षी या महोत्सवामध्ये अधिकचा बदल करून लोककलावंताच्या वयोवृद्ध कलावंतांचा सन्मान करण्याचे नियोजन या मेळाव्यामध्ये उपस्थित गोंधळी समाज कलावंतांनी आपले मत व्यक्त केले.आष्टी येथील आषाढ महोत्सव लोक कलावंत मेळाव्यासाठी तुकाराम दुणगू बाबासाहेब बेदरे गोरख ढवळे राजेंद्र पाचंगे,अक्षय बेंद्रे बाळासाहेब काटे मधुकर काटे कालिदास बेद्रे दादा गरडकर, विशाल भंडारे,भास्कर काटे संदीप बडगे ओंकार बेंद्रे कचरू बेदरे सुदाम बडगे पिनु धुमाळ भाऊसाहेब पाचंगे भगवान बेंद्रे आकाश वाडेकर रामदास धुमाळ सचिन धुमाळ सुधाकर काटे देवदासी चंद्रभागा, शिल्पा, लक्ष्मी ताई,संगीता, अश्विनीताई, राजेंद्र पाचंगे आबासाहेब ढोबळे पप्पू गरडकर अमोल पाचंगे अनिल मराठे नितीन धुमाळ दत्ता पवार आदी १२० नामवंत कलाकार यांची नावं नोंदणी करण्यात आली.गोंधळी कलावंत लोक कलावंत शाहीर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या महोत्सवाचे आयोजन हिंदवी रेणुराई गोंधळी समाज संघटना आष्टी यांच्या वतीने करण्यात येते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामेश्वर चव्हाण दीपक शिंदे यांनी केले हा लोक कलावंत महोत्सव वर्षानुवर्ष चालत आहे आणि ही परंपरा वृध्द कलावंत नवोदित कलाकारांना प्रेरणा मिळावी हा उद्देश समोर ठेवून या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील अनेक लोक कलावंत उपस्थित असतात हा आषाढ महोत्सव हिंदवी रेणुराई गोंधळी समाज संघटना यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला होता हा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी आष्टी शहरातील सर्व गोंधळी समाज बांधवांनी परिश्रम घेतले. अणि हा कार्यक्रम यशस्वीरित्या आनंदात संपन्न झाला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या