Ticker

6/recent/ticker-posts

संत वामनभाऊ महाराजांच्या दिंडीला माजी आ.भीमराव धोंडे यांची महापंगत ........... हजारो भाविक भक्त आणि वारकऱ्यांनी दिले आशीर्वाद; धोंडेंनी वारकऱ्यांचे घेतले दर्शन!

आष्टी (प्रतिनिधी) गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने दरवर्षी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी दिंडी सोहळ्याची परंपरा आहे. या पायी दिंडीतील वारकऱ्यांना माजी आ.भीमराव धोंडे यांच्यावतीने महापंग देण्याची परंपरा आहे.यंदाही माजी आ.भीमराव धोंडे यांच्यावतीने सबंध वारकरी बांधवांना मिस्टांनाची महापंगत देऊन भीमराव धोंडे यांनी सामाजिक कर्तव्य जपलेच किंबहुना सामान्य शेतकरी, शेतमजूर वारकऱ्यांच्या पायी नतमस्तक होऊन त्यांनी आशीर्वाद घेतले आणि साधेपणाची आपली परंपरा पुन्हा कायम ठेवली.शुक्रवार दि.६ जुलै २०२५ रोजी अवघ्या महाराष्ट्राने देशाचा अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला अध्यात्मिक केंद्रस्थान विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी लाखो वारकरी अत्यंत आनंदी आणि पवित्र मनाने नतमस्तक होण्यासाठी मार्गस्थ झालेले आहेत.गाव वाड्यावर त्या आणि शहरामधूनही विविध जाती धर्म पंथांच्या पायी दिंडी जाऊ लागले आहेत. धार्मिक अधिष्ठान असलेले अनेक परिवार मनोभावे त्यांची नाश्ता, फळे,पाणी, आरोग्य सुविधा तसेच भोजन देऊन आपले कर्तव्य निभावतात.माजी आ.भीमराव धोंडे यांचे वडील कै.आनंदराव धोंडे (बाबाजी), चुलते,आजी हे धार्मिक वृत्तीचे होते.भक्त भाविक आणि वारकऱ्यांची मनोभावे सेवा करणे हे त्यांनी आयुष्यभर जपले.त्यानंतर हे धोंडे परिवाराची परंपरा माजी आ. भीमराव धोंडे यांच्यावतीने पार पाडली जाते.आज शुक्रवारी या दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांना मिस्टांनाची महापंगत देऊन माजी आ.भीमराव धोंडे यांनी राजकीय नेते असतानाही महाराज व वारक-यांसोबत बसून त्यांनी हा पवित्र प्रसाद ही मनोभावे सेवन केला. यावेळी माजी आ.भीमराव धोंडे, डाॕ.अजयदादा धोंडे, अभयराजे धोंडे, जयंत राख,राजेंद्र धोंडे,रामराव खेडकर,रामदास बडे,सभापती सौ. सुवर्णाताई लांबरुड,रत्नदीप निकाळजे,प्रा. शिवदास विधाते, बाळासाहेब शेकडे,इंजि.एम. एन.बडे,महारुद्र खेडकर,रमेश सिरसाट,भागवत वारे,बाळासाहेब शेकडे,उत्तम बोडखे,नईम शेख,रघुनाथ शिंदे, विठ्ठलराव लांडगे, हरिभाऊ जंजीरे,प्रा. डाॕ.बाळासाहेब धोंडे, सावळेराम जायभाये,हरि बोडखे,सोनाजी गांजुरे,माजी उपसभापती जालींदर सानप, बाबासाहेब ससाणे,बबनराव सांगळे,भाऊसाहेब लटपटे, ज्ञानदेव केदार,ह.भ.प. आसाराम बडे महाराज,गहिनीनाथ खेडकर महाराज, आजिनाथ लाड महाराज, रामशास्त्री वनवे महाराज, शिवाजी वनवे महाराज,विष्णु महाराज वनवे, संजय शेंडे आदि मान्यवर उपस्थित होते. ------------------ पंढरपूरजवळ संत वामनभाऊ दिंडीला महापंगत ------------------ संत वामनभाऊंच्या लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र पंढरीच्या वाटेवर अत्यंत पवित्र मनाने तल्लीन होऊन मार्गस्थ असतानाच दरवर्षीप्रमाणे यंदाही २५ व्या.वर्षी माजी आ.भीमराव धोंडे यांनी पंढरपूरजवळ संत वामनभाऊ दिंडीला महापंगत दिली.या पालखी सोहळ्यात धोंडे हे परवा ५ कि.मि.अंतर पायी चालले.आज शुक्रवार दि.४ जुलै रोजी महापंगत दिली.अध्यात्म परंपरेमध्ये भीमराव धोंडे घराण्याची वारीची सेवा करण्याची परंपरा माजी आ.भीमराव धोंडे यांनी सातत्याने जपली आहे. महाराष्ट्राच्या संत परंपरेने पावन अशा भूमित पंढरीच्या वारकऱ्यांना स्नेहभोजन देऊन कर्तव्य निभावण्याची कर्तव्य भावना अत्यंत पवित्र मनाने गेल्या २५ वर्षापासून माजी आ.भीमराव धोंडे यांनी जपली आहे.महाराष्ट्रातील संतांनी सांगितलेला समता,बंधुत्व, ऐक्याचा संदेश यापुढेही आपण जतन करू.संतांचा समतेचा संदेश पुढे नेऊ असे सांगत अत्यंत पवित्र, उत्साही आणि भक्तीमय वातावरणात संत वामनभाऊंचा पालखी सोहळा अशी पावित्र्यपूर्ण भावनिक साद माजी आ.भीमराव धोंडे यांनी दिली. श्रीक्षेत्र गहिनीनाथगडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज गहिनीनाथकर यांंच्या नेतृत्वाखाली गहिनीनाथगड ते पंढरपूर असा पायी दिंडी पालखी सोहळा आज शुक्रवार दि.४ जुलै रोजी पंढरपूरजवळ असलेल्या पखालपूर गणपती मंदीर येथे दुपारी २ वा. पोहचला.येथे परंपरेप्रमाणे माजी आ.भीमराव धोंडे यांंच्यावतीने ५० हजार वारक-यांना भोजन दिले.यावेळी श्रीक्षेत्र गहिनीनाथगडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज यांच्या उपस्थितीमध्ये वारकऱ्याशी संवाद साधताना ते बोलत होते.शेकडो वर्षापूर्वी संत वामनभाऊ महाराज यांनी या पालखी सोहळ्याची सुरुवात केली होती. अहिल्यानगरसह मराठवाड्यातील वारकरी संत वामनभाऊ महाराज यांच्या दिंडीत सहभागी होतात. मराठवाड्यातील सर्वात मोठा पालखी सोहळा म्हणून श्रीक्षेत्र गहिनीनाथगडाच्या दिंडीची ओळख आहे. ------------------- चौकट -------- विठुरायाची आस; आणि वारकऱ्या सोबत धोंडे झाले भाऊक! ----------------- संपुर्ण राज्याच्या कानाकोपऱ्यातून सामान्य भाविक भक्त पायी दिंडीतून विठुरायाच्या दर्शनासाठी धावत आहेत.ऊन,वारा,पाऊस, वादळ याची कसलीही तमा न करता पंढरीच्या दिशेने या दिंड्या मार्गस्थ आहेत.या अत्यंत पवित्र मनाने,सुगंधी वातावरणात माजी आ. भीमराव धोंडे यांनी दिलेली ही महापंगत वारकऱ्यांसाठीही मौलिक ठेवा ठरला.हजारो वारकऱ्यांनी माजी आ.भीमराव धोंडे यांना मनापासून धन्यवाद आणि आशीर्वाद दिले. -------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या