
आष्टी ( प्रतिनिधी)
आष्टी येथील श्री.छत्रपती शाहू,फुले,आंबेडकर कृषी
महाविद्यालयातील कृषी वनस्पतीशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत
असणारे प्रा.ए.एस. पवार यांना कृषी जैवतंत्रज्ञान या विषयात संशोधनासाठी
पीएच.डी.पदवी प्रदान करण्यात आली. ही पदवी त्यांना भगवंत विद्यापीठ, अजमेर राजस्थान
येथून प्रदान करण्यात आली असून त्यांनी "मॉलिक्युलर मार्कर वापरून यीस्ट
स्ट्रेन्सचे जनुकीय विविधता" या विषयावर आपला शोधप्रबंध सादर केला आहे. त्यांच्या
या प्रबंधासाठी डॉ. कुंवर ज्ञानेंद्र कुमार यांचे मार्गदर्शन लाभले. या उल्लेखनीय
शैक्षणिक यशाबद्दल प्रा.ए.एस.पवार यांचे आनंद चॅरिटेबल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष
माजी आ. भीमराव धोंडे यांनी कौतुक करुन या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. हे यश
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे संशोधन कार्य
महाविद्यालयाच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील प्रगतीस हातभार लावणारे ठरेल असा
विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कृषी महाविद्यालयात वेगवेगळ्या शेती विषयावरती
संशोधन कार्य सुरु करावे असेही आवाहन केले.संस्थेचे सहसचिव डॉ.अजयदादा धोंडे,
कोषाध्यक्ष अभयराजे धोंडे याःनी अभिनंदन केले. प्रशासन अधिकारी डॉ.डी.बी.राऊत,
सागर
वाघुले व कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम आरसुळ यांच्या हस्ते
प्रा.ए.एस.पवार यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी कृषी महाविद्यालयातील सर्व
प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
0 टिप्पण्या