Ticker

6/recent/ticker-posts

गणपती बाप्पा बुद्धीचे देव ठरतात ........ साध्वी ह.भ.प.सोनाली दीदी करपे ......... शिवमहापुराण कथेला भाविकभक्तांची प्रचंड गर्दी

आष्टी (प्रतिनिधी) मानवी जीवनात अध्यात्माचे अधिष्ठान मौल्यवान असून संस्कार घडवण्यामध्ये धर्माची भूमिका अत्यंत निर्विवाद असून त्यातून योग्य मार्ग सापडतो आणि जीवन खऱ्या अर्थाने भाग्यवान ठरते असे सांगत गणपती बाप्पा हे खरे बुद्धीचे देव ठरतात असे अध्यात्म वचन सुप्रसिद्ध शिवमहापुराण कथा प्रवक्ते तथा प्रसिध्द कीर्तनकार साध्वी ह.भ.प.सोनाली दिदि करपे यांनी व्यक्त केले. अहिल्यानगर जिल्ह्यातील चिंचोडी पाटील येथे संत सावतामाळी व संत नामदेव महाराज संयुक्त पुण्यतिथी निमित्त आयोजित शिव महापुराण कथा ज्ञानयज्ञात त्या बोलत होत्या.शिवमहापुराण कथा निरूपण करताना साध्वी ह.भ.प.सोनाली दिदि करपे यांनी अनेक प्रसंग जिवंत केले. यावेळी संत मदन महाराज देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. बबन महाराज बहिरवाल, ह.भ.प.चैतन्य महाराज करपे, ह.भ.प.संजय मेटे महाराज, ह.भ.प.संजय घोडके महाराज, अ.नगर कृ,उ.बा.समितीचे माजी सभापती भाऊसाहेब कर्डीले,महेश बहिरवाल,माजी सभापती बाजीराव हजारे, सरपंच,जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,इंजि.पी.बी.बोडखे, चेअरमन बबनराव नन्नवरे, एस.पी.बोडखे सर आदि मान्यवर उपस्थित होते. साध्वी सोनाली दिदी पुढे म्हणाल्या की,कार्तिक स्वामी व गणपती बाप्पा यांची प्रदक्षिणा हा प्रसंग सांगताना व‌ त्यांनी शिवमहापुराण कथा निरुपन करताना कार्तिक स्वामी व गणपती बाप्पा यांची प्रदक्षणा प्रसंग कथन केला. बापाचा व बाप्पाचा संवाद कसा झाला. आई वडीला यांनाच उंदीरावर बसुन प्रदक्षणा घेतली.ही प्रदक्षिणा पृथ्वी प्रदक्षणा ठरली. त्यामुळेच गणपती बाप्पा बुध्दीचे देव ठरतात.कार्तिकस्वामीला वरदान दिले जेथे जेथे मंगल कार्यक्रम,पुजा अर्चा होईल तेथे तांब्यावर ठेवलेला नारळ हे कार्तिकस्वामी असतील असे सांगण्यात आले.आईला (माता पार्वतीला) दोन्ही लेकरं समान असल्याने दोघांना महादेवाकडुन आईनेच सन्मान मिळवून घेतला.या प्रसंगालाही त्यांनी उत्तम व्यक्त करत रसिक श्रोते आणि भाविकभक्तांचा प्रतिसाद मिळविला.यावेळी त्यांनी गणपती बाप्पा ने महादेवाला केलेली प्रदक्षिणा पाहिली आणि शेवटची ठरेल म्हणून महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा घातली जात नाही. जो भक्त महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा घालीन त्याला पुण्य नाही परंतु पाप लागेल असे पार्वती मातेने सांगितल्याचा प्रसंग हे त्यांनी यावेळी सांगितला.एका मुलाच्या डोळ्यात हसू आणि एका मुलाच्या डोळ्यात असु हे बरोबर नाही असे पार्वती माता महादेवाला म्हणाल्या. महादेवाकडून दोघांना सन्मान मिळवून घेतला या धार्मिक अलोक प्रसंगात त्यांनी योग्य गुंफण केली. चौकट --------
शिव महापुराण कथाकार आणि प्रवचनकार साध्वी ह.भ.प. सोनाली दिदि करपे यांनी अत्यंत भावपूर्ण आध्यात्मिक अनेक प्रसंग आणि उदाहरणे दृष्टांत सांगून उपस्थित शिवभक्त व भाविकांना भारावून सोडले.अत्यंत शांत आणि सजग राहून उपस्थित आणणे त्यांच्या या शिव महापुराण कथेचा आस्वाद घेतला.यावेळी दीदींचा सत्कार करून आभार मानण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या