Ticker

6/recent/ticker-posts

आ.सुरेश धस यांची मराठा आरक्षणासाठी कोरोना काळातील काढलेल्या मोर्चाच्या गुन्ह्यातुन निर्दोष मुक्तता

,
आष्टी (प्रतिनिधी) आष्टीचे आ.सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली कोरोना काळात मराठा आरक्षणासाठी लाखोंच्या उपस्थितीत बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. कोरोनाकाळात रस्त्यावर यायला बंदी होती त्यावेळी समाजहित डोळ्यासमोर ठेऊन हा मोर्चा काढण्यात आला होता.मराठा आरक्षणासाठी शासनाच्या विरोधात मोर्चा काढला म्हणून लोकांविरुध्द कलम १८८,२७९ ,२८० भादंवी सह कलम ५१ (ब) तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ सह कलम २,३,४ साथीचे रोग कायदा प्रमाणे गुन्हा दाखल केला.आ.सुरेश धस यांच्यासह नगराध्यक्ष राजू जाधव,सुखदेव सानप,जि.प सदस्य माऊली जरांगे,सचिन उबाळे,यशवंत खंडागळे,शेख वसीम यांच्यावर केस करण्यात आली होती.आज दि.२३ जुलै रोजी बीड न्यायालयाने आ. सुरेश धस यांच्यासह नगराध्यक्ष राजू जाधव,सुखदेव सानप, जि.प सदस्य माऊली जरांगे, सचिन उबाळे,यशवंत खंडागळे, शेख वसीम निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.आ.सुरेश धस हे समाजासाठी अहोरात्र कार्य करणारे लोकप्रतिनिधी आहेत.आतापर्यंत मराठा मोर्चात त्यांनी सतत आवाज उठवला आहे.मराठा आरक्षणसाठी विधानसभे पासून रस्त्यावरच्या लढाईमध्ये सतत समाजासोबत दिसू प्रसंगी त्यांच्यावर केसेस झाल्या पण हा समाजकार्याचा वसा आणि वारसा त्यांनी जोपासला आहे. यावेळी स्व.संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख व वकील बांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या