Ticker

6/recent/ticker-posts

संघर्षातून नेतृत्व सिध्द करणाऱ्या लोकनेत्या पर्यावरण मंत्री ना.पंकजाताई मुंडे

विशेष लेख --------- उत्तम बोडखे - -----------
बीड जिल्ह्यातील राजकारणाला वेगळी दिशा देण्याचे श्रेय पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांना जाते. ना.पंकजाताई मुंडे यांच्या जीवनावर नजर टाकली तर " संघर्ष " मय प्रवासाची यशस्वी गाथा अशीच दिसते.तत्कालीन राजकारणातील दिग्गजांशी लढणे तसे सोपे नव्हते.संघर्ष, आव्हानेही ना.पंकजाताई मुंडे यांनी " संधी " म्हणून स्विकारली आणि इतिहास घडवला.महाराष्ट्राला पुरोगामी विचारांचा समतावादी चळवळीचा आणि न्याय, संघर्षाचा उज्ज्वल इतिहास आहे.म.फुले,शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी वंचित समाजाला आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी विचार तर दिलाच शिवाय लोकचळवळही चालविल्या.या महापुरुषांच्या ज्वलंत विचारांची " ध्वजा " खांद्यावर घेऊन " संघर्ष " करणाऱ्या बीड जिल्ह्याच्या एक लढाऊ लोकनेत्या आहेत.ना. पंकजाताई मुंडे यांचा आज वाढदिवस आहे.त्यानिमित्त त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांनी घेतलेला थोडक्यात आढावा... --------------------- लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा राजकीय वारसा लाभलेल्या पंकजाताई संघर्षकन्या आहेत. नवनिर्मितीचा ध्यास घेऊन इतिहास रचणाऱ्या दिग्गजांच्या पोटी ना.पंकजाताई यांनी जन्म घेतला असला तरी त्यांनी आपल्या कष्टातून,मेहनतीतुन आणि संघर्षातून आपले नेतृत्व सिध्द केलेले आहे.विविध विषयांचे ज्ञान,अभ्यास,संयम, दुरदर्शिता असणाऱ्या राज्यातील बोटावर मोजण्याइतक्या नेत्यांमध्ये नामदार पंकजाताई मुंडे यांचा समावेश आहे.विविध पदे भूषविल्याने त्यांना विविध विषयातील जाण आणि विविध जबाबदारी सांभाळण्याची क्षमता लक्षात येते.सर्वसामान्य जनतेशी संवाद,विविध कार्यक्रमांना उपस्थिती, प्रशासकीय कामांसाठी धावपळ,विविध कार्यक्रमांना उपस्थिती,बीड जिल्ह्यातील जनतेशी थेट संपर्क तेवढ्याच तत्परतेने करतात.सामाजिक प्रश्नांची विविधांगी जाण आहे म्हणूनच सर्वसामान्य माणसांचे प्रश्न समजून घेऊन त्यांचे योग्य समाधान करण्याच्या गुणांमुळेच त्या सामान्य जनतेच्या " लोकनेत्या " झाल्या आहेत. जनतेप्रती त्यांचे हृदयापासून असलेली संवेदना,तळमळ वाखाणण्याजोगी आहे.सूड भावनेचे राजकारण त्यांनी कधी केलेले नाही.शेतकरी,गरीब, वंचित व विकासाचा वारा न लागलेल्या जनतेसाठी समाजकारण,राजकारण ना. पंकजाताई मुंडे करतात. ना. पंकजाताई मुंडे यांच्या गतीशिल,कृतीशिल जीवनाचा आपल्याला अभिमान आहे. ना.पंकजाताई मुंडे सदैव शेतकरी,कष्टकरी,गोरगरीब ऊसतोडणी कामगार,वंचीत, दुर्बल घटकांसाठीच काम करतात.सामान्यांच्या प्रगतीची ना.पंकजाताई मुंडे नेहमी काळजी करतात.माणूस हा कधीच जन्माने श्रेष्ठ ठरत नाही तर तो आपल्या कर्माने श्रेष्ठ ठरतो असे मानणाऱ्या पंकजाताईसाहेब आहेत. लोकनेते गोपीनाथराव मुंडेसाहेब यांच्या अकाली निधनानंतर जी राजकीय समीकरणे झपाट्याने बदलली त्यामधून पर्यावरण ना. पंकजाताई मुंडे यांचे नेतृत्व पुढे आले.खुद्द मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनीसुध्दा मुख्यमंत्री झाल्यानंतर दुरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीला दिलेल्या पहिल्या मुलाखतीत म्हटले होते की,ज्या दिवशी मुंडेसाहेबांचे निधन झाले त्यानंतर पहिल्यांदा राज्याचे नेतृत्व करण्याची संधी आपल्याला मिळू शकते हा विचार मनात आला,लोकनेते मुंडेसाहेब यांच्या निधनामुळेच फडणवीस यांना नेतृत्व मिळाले होते.एका मोठ्या नेतृत्वाच्या निधनानंतर निर्माण झालेल्या पोकळीतून नव्या नेतृत्वाला जन्म मिळाला.सिंहावलोकन केले तर ना.पंकजाताई मुंडे यांनी महाराष्ट्र राज्य समक्षपणे सांभाळले आहे हे मान्य करावे लागेल.लोकनेते गोपीनाथराव मुंडेसाहेबांच्या निधनानंतर ना.पंकजाताईंनी आपल्या लहान बहिणीला वडिलांचे प्रेम आणि आधार दिला. राजकारणातला श्री गणेशा शिकविला.आपले संपुर्ण आयुष्य गोरगरीब जनतेसाठी व वंचित घटकांच्या उद्धारासाठी खर्च करणा-या लोकनेत्या नामदार पंकजाताई मुंडे आहेत. पर्यावरण मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसानिमित्त दैनिक झुंजारनेता परिवाराचे वतीने हार्दिक शुभेच्छा ...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या