आष्टी (प्रतिनिधी)
'...अगदी लहानपणापासूनच कुठल्याही बाबीची आवड निर्माण केल्यास भविष्यात त्या दिशेने मुलं जातात... असे म्हणतात; अगदी त्याच अनुषंगाने आष्टी येथे माजी आमदार,शिक्षण महर्षी भीमराव धोंडे यांच्या दूरदृष्टीतून भगवान महाविद्यालयात भव्य क्रीडांगणांची उभारणी करण्यात आली आहे. या क्रीडांगणामध्ये प्रचंड व्यायाम आणि कसरती करून विविध क्षेत्रात अनेक मल्ल यशस्वीपणे भरती झालेले आहेत.आष्टी ते अहिल्यानगर रस्त्याच्या बाजूला भगवान महाविद्यालयाच्या परिसरात क्रीडा पटूंसाठी भीमराव धोंडे यांनी भव्य क्रीडांगणाचे उभारणी केली. यात अनेक जण आजही दररोज सकाळी रनिंगसह विविध व्यायाम करून शरीर निरोगी करण्यासाठी प्रयत्नशील राहतात.
याच भव्य प्रांगणावर आष्टी येथील जेष्ठ पत्रकार आणि उपसंपादक उत्तम बोडखे यांनी त्यांचा तीन वर्षाच नातू आदिराज याला व्यायामाचे प्रारंभिक प्राथमिक धडे दिले. या रणांगणावर एकूण वातावरण पाहता अगदी तीन वर्षाचा नातू अगदी प्रसन्न मुद्रेने आपल्या आजोबाच्या साथीने हातात हात घेऊन चालण्याची कसरत करीत आहे.एकूणच अशा भागात या छोट्याशा नातवाला निरोगी बळकट शरीरासाठी आतापासूनच व्यायामाचे धडे देऊन एक योग्य मार्ग दाखवण्याचा प्रयत्न या आजोबाच्या माध्यमातून झाल्याचे यावेळी उपस्थित व्यायाम करताना सांगितले.
चौकट
--------
धोंडेंच्या दूरदृष्टीमुळे हजारो
तरुणांना सैन्यात संधी!
------------------

माजी आ. भीमराव धोंडे यांनी गेल्या तीन दशकावरून अधिक काळ राजकारणासह समाजकारण आणि त्यातून शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. आष्टी तालुक्यातील यामुळे हजारो ग्रामीण शेतकऱ्यांची मुले शिक्षण घेऊन स्वावलंबी बनली याच भगवान महाविद्यालयाच्या प्रांगणावर या आजोबा आणि नातवाच्या या विहंगम दृश्याने पुन्हा या बाबींना उजाळा मिळाला.माजी आ.भीमराव धोंडे यांना यानिमित्ताने धन्यवाद देण्यात येतात.
------------------
0 टिप्पण्या