Ticker

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांचे प्रश्न विधीमंडळात मांडल्यबद्दल युवा नेते किरण शिनगीरे यांच्याकडुन आ.सुरेश धस यांचे आभार..

आष्टी (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांना कुणबी व्हॅलिडीटी प्रमाणपत्र वेळेत मिळत नसल्याने शैक्षणिक व करिअर संदर्भातील अडचणी वाढत चालल्या आहेत.संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या दिरंगाईमुळे विद्यार्थी आणि पालक हैराण झाले आहेत.ही समस्या किरण भगावान शिनगिरे यांनी लक्षात घेऊन आ.सुरेश धस यांच्याकडे मांडली होती.त्यानंतर आ. सुरेश धस यांनी हा प्रश्न विधिमंडळात मांडला याबद्दल किरण शिनगिरे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहे.या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून आ.सुरेश धस यांनी विधिमंडळात थेट या विषयावर आवाज उठवत विद्यार्थ्यांच्या अडचणींवर प्रकाश टाकला.विद्यार्थ्यांची पिळवणूक थांबावी आणि कार्यपद्धती सुलभ व्हावी यासाठी त्यांनी तात्काळ हस्तक्षेप केला.या सकारात्मक पुढाकाराबद्दल विद्यार्थ्यांच्या वतीने युवा नेते किरण शिनगिरे यांनी आ.सुरेश धस यांचे आभार मानले आहेत.या प्रश्नाच्या योग्यवेळी व योग्यठिकाणी मांडणीमुळे विद्यार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या