Ticker

6/recent/ticker-posts

आज आष्टीत दिव्यांगाची पूर्व तपासणी व नोंदणी शिबिर

आष्टी (प्रतिनिधी ) बीडचे लोकप्रिय खा.बजरंग सोनवणे यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासन व एलिम्को मुंबईच्यावतीने दिव्यांग बांधवांचे मोफत पूर्व तपासणी व नोंदणी शिबिराचा गरजु दिव्यांग व्यक्तींनी लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आण्णासाहेब चोधरी यांनी केले आहे.कृत्रिम साहित्य व साधन वाटप शिबिर आष्टी पंचायत समितीमध्ये आज शुक्रवारी २५ जुलै रोजी होणार आहे.या शिबिराचा दिव्यांग बांधवांनी लाभ घ्यावा असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गटाचे) नेते आण्णासाहेब चौधरी यांनी केले आहे.बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये शिबिर आयोजित करण्यात आलेले आहेत. दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रिम अवयव,सहाय्यभूत साधने देणे, ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत मोफत सहाय्यक उपकरणे प्रदान करणे हा आहे.हे शिबिर आष्टी पंचायत समिती सभागृहात होणार आहे.आरोग्य तपासणी, नोंदणी,त
त्काळ मोफत कृत्रिम अवयवांचे वाटप करण्यात येणार आहे अशी माहितीही राष्ट्रवादीचे नेते आण्णासाहेब चौधरी यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिली. - -----------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या