Ticker

6/recent/ticker-posts

संत सावता महाराज व संत नामदेव महाराज पुण्यतिथी सोहळ्या निमित्त अखंड हरिनाम सप्ताह

आष्टी (प्रतिनिधी) अहिल्यानगर जिल्ह्यातील मिरजगाव येथे संत शिरोमणी सावता महाराज समाधी सोहळा व संत नामदेव महाराज पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त दि.१७ ते २४ जुलै २०२५ या कालावधीत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळा होत आहे. सप्ताहाचे २७ वे.वर्षे आहे. अखिल विश्वातील मानव जातीतील जिवंत कर्मयोग व भक्ती योग शिकवणारे महान संतश्रेष्ठ ज्ञानवैष्णव श्री संत नामदेव महाराज व श्री संत शिरोमणी सावता महाराज समाधी सोहळा पंढरीश पांडुरंगाच्या कृपेने साधु संतांच्या व चैतन्य आत्मारामबा यांच्या आशीर्वादाने व वै.ह.भ. प.सोपानकाका माने यांच्या प्रेरणेने आणि ह.भ.प.गणेशानंद महाराज चेडे यांच्या मार्गदर्शनाने सप्ताह होत आहे. भाविक भक्तांनी या धार्मिक कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ह.भ.प.गणेश महाराज चेडे यांनी केले आहे.या सप्ताहात काकडा आरती,विष्णु सहस्त्रनाम व प्रार्थना,ज्ञानेश्वरी पारायण,संतचरित्र कथा, हरिपाठ, हरिकीर्तन व हरिजागर आदि धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.ह.भ.प.कृष्णा महाराज भांड यांची सुश्राव्य संतचरित्र कथा होणार आहे.व्यासपीठ चालक म्हणून ह.भ.प. ऋषिकेश महाराज देशमाने (आळंदी देवाची) हे काम पाहत आहेत.या सप्ताहात ह.भ.प. गोविंद महाराज शिंदे,ह.भ.प. महावीर महाराज पोटे,ह.भ.प. प्रभु महाराज माळी, ह.भ.प. संजय महाराज घोडके,ह.भ.प. पांडुरंग जाधव गुरुजी महाराज यांचे रात्री हरिकीर्तन होणार आहेत.मंगळवार दि.२२ जुलै रोजी सकाळी १० ते १२ यवेळात भगवताचार्य ह.भ.प अशोक महाराज भोसले यांचे संत नामदेव महाराज पुण्यतिथीनिमित्त हरिकीर्तन होणार आहे.रात्री ह.भ.प. संतोष महाराज वनवे यांचे हरिकीर्तन तर बुधवार दि.२३ जुलै २०२५ रोजी सकाळी संत सावता महाराज समाधी सोहळ्यानिमित्त भागवताचार्य विश्वनाथ महाराज रिठे यांचे सकाळी १० ते १२ यावेळात हरिकीर्तन होणार आहे.रात्री ह.भ.प.राऊतदादा महाराज पिंपळा यांचे हरिकीर्तन होणार आहे.गुरुवार दि.२४ जुलै रोजी सकाळी १० ते १२ यावेळात ह.भ.प.गणेशानंद महाराज चेडे यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.यानंतर बबनराव सातव यांच्यातर्फे महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. ------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या