Ticker

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वीज कर्मचाऱ्यांना सुरक्षा कीटचे वाटप

आष्टी (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पाटोदा येथील इंजिनिअर,काॕन्ट्रक्टर तथा रुद्र इलेक्ट्रिकल्सचे मालक मंगेश बाबासाहेब रंधवे यांच्यावतीने विद्युत कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा किट वाटप करण्यात आले आहे.पाटोदा उपविभागातील सर्व कर्मचाऱ्यांना हे साहित्य वितरित करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या जन्मदिनी सामाजिक उपक्रम राबविण्याचे आवाहन केले होते त्यानुसार पाटोदा येथे हा उपक्रम घेण्यित आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.सुरेश धस यांचे चिरंजीव युवा नेते सागर धस होते. या कार्यक्रमास ह.भ.प.महंत रामकृष्ण महाराज रंधवेबापु, महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रेमसिंह राजपूत, कार्यकारी अभियंता सुबोध डोंगरे,पाटोदा येथील उपकार्यकारी अभियंता मेघशाम सावकारे,नगराध्यक्ष राजू जाधव, सभापती रामेश्वर गोरे,चेअरमन बाळासाहेब शिंदे (आष्टी),पत्रकार अनंत वैद्य, सुनील वाघमारे,माजी उपनगराध्यक्ष नय्युम पठाण, व्यापारी अजिंक्य बोरा, तलाठी अभिजीत देशमुख,बाबासाहेब रंधवे सर,गिरीश हजारे,शाहु रंधवे (कापड व्यापारी) , सहायक अभियंता अमोल मुंडे,कनिष्ठ अभियंता आदर्श कदम,शेख,आकाश शिक्केतोड हे उपस्थित होते. याप्रसंगी सागर धस यांनी सुरक्षा किट वाटपाचा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगीतले.विद्युत कर्मचाऱ्यांसाठी हे सुरक्षा किट म्हणजे अत्यंत ऊपयोगी आहे. त्याचा वापर सर्व कर्मचाऱ्यांनी करून आपले जीवन सुरक्षीत ठेवावे असे सांगातले. हा स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल मंगेश रंधवे यांचे कौतुक केले.असा उपक्रम सर्व मतदार संघात राबविण्याबाबत ईतर मोठ्या काॅन्ट्रक्टरांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.महंत रामकृष्ण महाराज रंधवेबापु यांनी त्यांच्या कुंटुंबातील त्यांचा पुतण्या मंगेश रंधवे यांनी जी सामाजिक दायित्वातून सर्व विद्युत कर्मचाऱ्यांना सुरक्षा किट देवुन सहकार्य केले त्याबद्दल समाधान व्यक्त केले.मंगेश रंधवेचे कौतुक केले.यावेळी अधिक्षक अभियंता प्रेमसिंह राजपूत यांनी महावितरण कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. सामाजिक दायित्वातून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले, कार्यकारी अभियंता सुबोध डोंगरे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त असा उपक्रम राबविणे कौतुकास्पद असल्याचे सांगीतले.यावेळी मंगेश रंधवे यांनी मनोगत व्यक्त करत सामाजिक भूमिकेतून आपण हा उपक्रम राबवित असल्याचे सांगीतले. आ. सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवुन साजरा करत असल्याचा आनंद असल्याचेही ते म्हणाले.यावेळी मोठ्या संख्येने विद्युत कर्मचारी उपस्थित होते. ------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या