Ticker

6/recent/ticker-posts

बेगड' पाठाचे लेखक योगीराज वाघमारे यांच्या भेटीने ३५ वर्षाच्या आठवणी ताज्या ............... संशोधक विकास गवई यांनी साहित्यातील सामाजिक संदेशाचे केले कौतुक

आष्टी (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक शिक्षण मंडळाच्या १९९२ सालच्या इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेच्या मराठी विषयात बेगड या पाठाचे लेखक योगीराज वाघमारे यांची एका शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंतांच्या सोहळ्यात छत्रपती संभाजीनगर येथे संशोधक विद्यार्थी विकास गवई यांनी भेट घेऊन त्यांच्या सामाजिक संदेशाचे मन भरून कौतुक केले. कवी साहित्यिक प्र.ई. सोनकांबळे यांच्या हस्ते विकास गवई यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय नागसेनवन येथे बारावीच्या वर्गात शिक्षण घेत असतांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवन आणि कार्यावर आयोजित वक्तृत्व स्पर्धेत सर्वप्रथम क्रंमाक मिळविल्या बद्मल प्र.ई. सोनकांबळे सर यांच्या हस्ते गौरविण्यात आले होते प्र.ई. यांचे आत्मचरित्र आठवणीचे पक्षी योगिराज वाघमारे यांचे बेगड यांचा साहित्याचा मोठा परिणाम ही विकास गवई यांच्यावरती आज ही झालेला दिसतो. बेगड कथेतील बौध्द समाजातील तरूण प्रकाश छत्रपती संभाजीनगरला जाऊन शिक्षण घेऊन नौकरीला लागतो; पण तो आपल्या समाजापासून कश्या प्रकारे तुटत जातो.यांचे वास्तव चित्रण हे बेगड या कथेत आलेले आहे. आज ही परिस्थिती बहुतांश आपल्या अवतीभवती दिसायला सुरुवात ही झालेली दिसते अशी खंत ही गवई यांनी व्यक्त केली आहे.छत्रपती संभाजीनगर येथे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन ही गवई यांनी सामाजिक नाळ घट्ट पकडून आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या ठिकाणी नेहमीच इतरांना सहकार्य विविध कार्यक्रमाचे आयोजन रक्तदान शिबीराचे दरवर्षी नामविस्तार दिनाच्या निमित्ताने सातत्याने घेत असतात.सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहून आपले सर्वच घटकातील लोकांना सातत्याने मदत करणे या करिता विकास गवई सर्वपरिचित आहेत हे विशेष आहे.बेगड या पाठाचे लेखक योगीराज वाघमारे यांच्या भेटीचा आनंदा अविस्मरणीय असून त्यांची सामाजिक बांधिलकी अत्यंत कौतुकास्पद असल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. चौकट -------- साहित्य वास्तवाचे भान आणि अंतर्मुख व्हायला शिकवते! ------------------------------- 'बेगड' पाठाचे लेखक योगीराज वाघमारे यांनी ग्रामीण बहुजन समाजातील मुलांचे शिक्षण त्यानंतर मिळालेले नोकरी आणि ग्रामीण समूह जीवनाकडे झालेले दुर्लक्ष या अनुषंगाने वेधलेले लक्ष अंतर्मुख करायला लावणारे आहे.साहित्य खऱ्या अर्थाने मनुष्याला वास्तवाचे भान आणि दिशा देण्याचे कर्तव्य बजावते हे यातून पाहायला मिळते. ---- विकास गवई ( संशोधक विद्यार्थी आणि अभ्यासक )

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या