Ticker

6/recent/ticker-posts

कोणताही खेळाडू जीवनात यशस्वी होतो ---- माजी आ.भीमराव धोंडे .......... सैराटचित्रपटामुळे माझे आयुष्य बदलले,धोंडे काॅलेजमुळेच मी घडलो ...... सैराटफेम सुरेश विश्वकर्मा

आष्टी( प्रतिनिधी) व्यायामाला आणि खेळाला जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी आतापासूनच वेगवेगळे खेळ खेळले पाहिजेत. कोणताही खेळाडू जीवनात यशस्वी होतो असे प्रतिपादन माजी आ. भीमराव धोंडे यांनी केले तर आनंदराव धोंडे महाविद्यालयात मी शिकलो या काॅलेजमुळेच माझे जीवन घडले,मी टीव्हीवरील मालिका आणि चित्रपटात काम करू शकलो ते फक्त धोंडे महाविद्यालयाच्या रंगमंचामुळेच असे मत सिने अभिनेता सुरेश विश्वकर्मा यांनी व्यक्त केले. आष्टी तालुक्यातील कडा येथील बाबाजी संकुलामध्ये माजी आ.भीमराव धोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त दि. १९ ते २१ जुलै अशा तीन दिवसांच्या भव्य क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन सिने अभिनेता सुरेश विश्वकर्मा यांच्या हस्ते झाले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे होते.याप्रसंगी व्यासपीठावर युवा नेते डाॕ. अजयदादा धोंडे,अभयराजे धोंडे,चित्रपट गीतकार संजय नवगिरे,महाराष्ट्र केसरी सईद चाऊस,चेअरमन राजेश धोंडे, सरपंच भीमराव पाटील, राजाबापु नलावडे, टिव्ही कलाकार सागर पंडागळे, अशोक साळवे, उपसभापती पांडुरंग नागरगोजे, किशोर खोले, डॉ.किसन गांजुरे, सरपंच दादा जगताप,चेअरमन दादासाहेब हजारे, ह.भ.प. पांडुरंग कर्डीले महाराज, हरिभाऊ जंजिरे, बजरंग कर्डीले, प्राचार्य डॉ.सुर्यकांत धोंडे, विठ्ठल लांडगे, सोनाजी गांजुरे, प्राचार्य भगवान वाघुले,जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे, गोवर्धन जाधव, शहादेव खेडकर, प्राचार्य डॉ.दत्तात्रय वाघ, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ.डी. बी.राऊत,प्रा. शिवदास विधाते, माऊली बोडखे, सागर वाघुले,संदीप ननवरे,प्राचार्य डॉ. हरिदास विधाते, प्राचार्य डॉ.अशोक गदादे,प्राचार्य डॉ. संजय धोंडे,प्राचार्य दादासाहेब काळे,मुख्याध्यापक संजय कोंथबीरे आदि मान्यवर उपस्थित होते.क्रिडा महोत्सवाच्या निमित्ताने प्रारंभी कडा शहरातून ३ हजार ७०० खेळाडूंची भव्य अशी रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ.हरिदास विधाते यांनी क्रीडा स्पर्धांचे महत्त्व सांगितले. पुढे बोलताना माजी आ.भीमराव धोंडे यांनी सांगितले की, खेळामध्ये हार जित होतच असते.पराभव झाला तरी कोणी विद्यार्थ्यांनी कमीपणा समजू नये सतत सराव करीत रहा. सराव केल्याने यश निश्चित मिळते.खेळामुळे सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. खेळ खेळणारा माणूस जीवनात निश्चित यशस्वी होतो.सिने अभिनेता " सैराट " फेम सुरेश विश्वकर्मा यांनी सांगितले की, मी या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे याचा मला खूप अभिमान आहे.आज ज्या स्टेजवरून मी बोलतोय या स्टेजवर मी घडलो.याच ठिकाणी नाटक, एकांकिका केल्या.अभिनय शिकलो आणि मी विद्यापीठ पातळीवर पोहोचलो. त्यामुळेच माझे भविष्य उज्वल झाले आज याच रंगमंचामुळे मी टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करीत आहे. खेळाडूंनी खूप प्रॅक्टिस करून खेळ खेळावे,मोठे व्हावे यश संपादन करावे आणि आपल्या आई वडिलांचे आणि शाळेचे नावलौकिक करावे.जीवनात शरीर संपत्ती ही महत्त्वाची आहे त्यामुळे खेळाला महत्त्व द्या कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर खेळाला महत्त्व आहेच.सैराट चित्रपटांमुळे माझे आयुष्य बदलले.त्या चित्रपटामुळेच मी घराघरात आणि लोकांच्या मनामनात पोहोचलो.यावेळी विश्वकर्मा यांनी सैराट चित्रपटातील संवाद ऐकूण विद्यार्थ्यांना प्रचंड खुष केले.गीतकार संजय नवगिरे व इतरांची भाषणे झाली. यावेळी "शेतकरीयन " या वार्षिक अंकाचे मान्यवरांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले.यावेळी पाहुण्यांचा परिचय संभाजी ओव्हाळ यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ.बापु खैरे व प्रा. शैलजा कुचेकर यांनी केले. उपस्थितांचे आभार उपप्राचार्य डॉ.भास्कर चव्हाण यांनी मानले. ------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या