Ticker

6/recent/ticker-posts

कासारी,क-हेवडगाव,बेलगांव ग्रा.पं.चे सरपंचांना आदर्श पुरस्कार प्रदान

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील क-हेवडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.वंदना परिवंत गायकवाड यांना लोकमत आदर्श सरपंच पुरस्कार मिळाला आहे.लोकमत सरपंच या स्पर्धेत आष्टी तालुक्यातील मुर्शुदपूर-कासारी-शिंदेवाडी गावच्या सरपंच सौ.शालन अशोक मुळे, क-हेवडगांव गावच्या सरपंच सौ.वंदना परिवंत गायकवाड,बेलगाव गावचे सरपंच तात्यासाहेब शिंदे आणि बेलगावचे सुपुत्र प्रविण वारे यांनी सहभाग घेतला होता. त्यांच्या गावातील उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन लोकमतच्या वतीने त्यांना सन्मानपत्र लोकमतचे पत्रकार अविनाश कदम यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी पत्रकार अक्षय विधाते हे उपस्थित होते.या सन्मानबद्दल आ.सुरेश धस,देवीदास धस,गटविकास अधिकारी गोकुळ बागलाने,जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,यशवंत खंडागळे आदिंनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या