आष्टी (प्रतिनिधी)
'..लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी आतुरलेल्या मनातून भक्ती,भाव,श्रद्धा, निष्ठा आणि अतिव ओढ असलेल्या हृदयाच्या प्रेम भावनेतून पायी दिंडी सोहळ्यात उत्स्फूर्तपणे सहभागी होत. अहिल्यानगरचे उद्योगपती आदित्य ताठे यांच्यासह ५० युवकांचा पायी दिंडीत प्रवास सुरु आहे.दि.२६ जुन रोजी अहिल्यानगर शहरातील गारडकरमळ्यातीला विठ्ठल रुक्मिणी व सावता माळी मंदीर देवस्थान येथुन पायि दिंडीचे प्रस्थान झालेले आहे. ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता ही दिंडी दि.५ जुलै रोजी पंढरपूरला पोहचणार आहे.अहिल्यानगर शहरातील गाडळकर मळ्यातील संत शिरोमणी सावता माळी मंदिर देवस्थानचा आषाढीनिमित्त पायी दिंडी सोहळा दिंडी संस्थापक ह.भ.प.रामदास गाडळकर महाराज असुन संत श्रीपादबाबा चव्हाण (घोटी) यांच्या कृपाशीर्वादाने ह.भ.प. अरुण महाराज धाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दि.२६ जुन रोजी दिंडीचे प्रस्थान झाले.दि.५ जुलै रोजी पंढरीत दिंडी पोहचणार आहे. अहिल्यानगर शहरातील प्रसिध्द आडते व्यापारी तथा युवा उद्योगपती अदित्य ताठे हे व ३०० वारकरी या पायी पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत.त्यांंच्यासमवेत ५० युवक या पायी दिंडीत सहभागी आहेत.आज सोमवारी जेऊरजवळ असलेल्या सोलापूर व अहिल्यानगर या दोन जिल्ह्याच्या सीमेवर शेगुड गावी या दिंडीचे स्वागत व नाष्टा बिसेलरी पाण्याचे वाटप इंजि.पी.बी.बोडखे,चेअरमन अरुण सायकड आणि जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांच्यावतीने करण्यात आले. दिडींत काही अंतर पायी चालत,ग्यानबा तुकाराम,विठ्ठल नामाचा जयघोष करीत प्रवास करुन आनंद घेतला. ही पायी दिंडी अहिल्यानगर,
तुक्कडओढा,वाळुंज,शिराढोण,वाटेफळ,छत्तीशी रुई, बनपिंपरी,रमजान चिंचोली, आनंदवाडी,कोंबळी,चांदे बु, वालवड,कर्जत,कोरेगाव फाटा, पिसेमळा,आंबी जळगाव,शेगुड,
माळंगी,बिनवडे वस्ती, विट,झरे, जेऊर,आदिनाथ कारखाना, कविटगाव,कंदर,टेंभुर्णी, नाळेवास्ती,दगडी अकोला, परिते,करकंब,पंढरपूर असा मार्ग आहे.विशेष म्हणजे आदित्य ताठे हे श्रीमंत कुटुंबामधील असुनही भक्ती भावाने आध्यात्मिक वातावरणात आनंद घेत पायी चालत आहेत.विठ्ठल नामस्मरणाच्या पवित्र वातावरणात रममान झालेले आहेत.अदित्य ताठे हे लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी मागील वर्षी आपल्या सौभाग्यवती सौ.सुवर्णासह वारीमधून पायी प्रवास सुरू केला होता.पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाची ओढ महाराष्ट्रासह देशभरातील भाविक भक्तांना लागले आहे. यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त द-याखोऱ्यातुन, डोंगरातून मिळेल त्या मार्गाने आणि ऊन वारा पाऊसात पंढरीकडे प्रवास करीत आहेत. देवयानी आषाढी एकादशी पंढरपूर यात्रा ६ जुलै अर्थात रविवारी आहे.त्या अनुषंगाने ही भावीक मंडळी अत्यंत पवित्र मनाने विठुरायाच्या जयघोषात पंढरीकडे पायी प्रस्थान करीत आहेत.याच वारीमध्ये माऊलींच्या पायी दिंडी सोहळ्यात विठुरायाच्या नाम घोषात पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करत डोक्यावर पांढरीशुभ्र टोपी गळ्यात पवित्र तुळशीची माळ आणि हातात टाळ घेऊन हे अदित्य ताठे पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी पायी दिंडी सोहळ्यात मार्गस्थ झाले आहेत.उद्योगपती अदित्य ताठे हे अभियंता पी.बी. बोडखे यांचे जावाई आहेत.सोमवार दि.७ जुलै रोजी ह.भ.प.अरुण महाराज धाडगे यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.
-------------------
चौकट
--------
विना घेण्याचा
मान आष्टीकरांना.
-----------------

गाडळकर मळ्यातील विठ्ठल रुक्मिणी मंदीर व संत सावतामाळी मंदिरातून निघालेला दिंडी सोहळा पंढरीच्या पांडुरंगाच्या दिशेने मार्गस्थ होतानाचा हा अत्यंत पवित्र क्षण पाहण्याचे भाग्य भक्तांना लाभले.दरम्यान,काही वेळ विना गळ्यात घेण्याचा अत्यंत दुर्मिळ क्षण आष्टीकरांच्या भाग्यात आला... ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांनी मात्र अत्यंत मनोभावे हा विना काही वेळ गळ्यात मनोभावे घेऊन भाविक भक्तांमध्ये रममान होण्यात आनंद मानला.विठ्ठल विठ्ठल जय जय....घोषणा हजारो भाविक भक्त विठुरायाच्या दर्शनासाठी टाळ मृदंगाच्या घोषात एकरूप झाले!
------------------
0 टिप्पण्या