आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी येथील डॉ.सय्यद डेंटल क्लिनिकच्यावतीने पंढरपूरकडे आगेकुछ
करणाऱ्या धुळे जिल्ह्यातील सिंदखेडच्या मठाधिपती मेघशाम नारायण महाराज यांच्या
दिंडीतील १५० वारकऱ्यांना दि.२ जुलै रोजी जामगाव रोडवरील सुनील लक्ष्मण रेडेकर
यांच्या वस्तीवर, टुथब्रश,टुथपेस्टचे मोफत वाटप करण्यात आले.रेडेकर वस्तीवर थांबून
पुढे मार्गस्थ होणारी ही ४१ दिंडी होती.डॉ.सय्यद डेंटल क्लिनिकचे डॉ.सय्यद
हुमायुद्दीन आणि कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांच्या विनंतीला मान देऊन लक्ष्मण
रेडेकर, सुनील रेडेकर,जालिंदर मच्छिंद्र पोकळे,दादासाहेब उर्फ पप्पू
गर्जे,प्रा.अशोक भोगाडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.डॉ. सय्यद वलीयुद्दीन
अल्लाउद्दीन यांनी सर्वांचे आभार मानले.
0 टिप्पण्या