Ticker

6/recent/ticker-posts

कड्यात होणाऱ्या भव्य दिव्य क्रीडा महोत्सवाचे उद्घाटनास नेता,अभिनेता येणार ............. अभिनेता सुरेश विश्वकर्मा येणार .......... प्राचार्य डाॕ.हरिदास विधाते

, आष्टी (प्रतिनिधी) संयम,शांतता,बंधुत्व एकमेकांना मनापासून सहकार्य करण्याची भावना आणि सामाजिक बांधिलकी मानून काम करण्याची सदैव चिकाटी,जिद्द आणि आत्मविश्वास या बळावर कुठल्याही क्षेत्रात यश मिळवता येते असे म्हणतात अशा शाश्वत लोकप्रियतेसाठी निष्ठा आणि प्रमाणिकपणा आवश्यक असतो आणि याच तत्वाने राजकारणात अत्यंत प्रामाणिकपणे राजकीय, सामाजिक कार्य करणारे राजकारणी,शिक्षण महर्षि अशी ख्याती आहे.आष्टी,पाटोदा, शिरूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार आणि शिक्षण महर्षी भीमराव धोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त कड्यात दि.१९ ते २१ जुलै २०२५ या कालावधीत भव्यदिव्य क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या क्रीडा महोत्सवात सुमारे ४ हजार खेळांडू सहभागी होणार आहेत. कडा शहरातुन सर्व खेळांडुची भव्य रॕली झाल्यानंतर क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.शनिवार दि.१९ जुलै रोजी या सकाळी १० वा.कडा येथील आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी काॕलेज मैदानावर उद्घाटन सोहळा होत आहे.या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन सिने अभिनेता सुरेश विश्वकर्मा यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे हे राहणार आहेत.प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र केसरी सईद चाऊस,गीतकार,अभिनेते संजय नवगिरे,डाॕ.अजयदादा धोंडे,अभयराजे धोंडे हे उपस्थित राहणार आहेत.या उद्घाटन सोहळ्यास क्रिडा प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आनंदराव धोंडे उर्फ काॕलेजचे प्राचार्य डाॕ. हरिदास विधाते,प्राचार्य डाॕ. अशोक गदादे,प्राचार्य डाॕ. दादासाहेब काळे,प्राचार्य डाॕ.संजय धोंडे,मुख्याध्यापक संजय कोंथबिरे यांनी केले आहे. आष्टी,पाटोदा,शिरूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार,शिक्षण महर्षी राष्ट्रीय खेळाडु भीमराव धोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त कडा येथे तीन दिवसांचा भव्य क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. शेतकरी शिक्षण संस्था,आनंद चॅरिटेबल शिक्षण संस्था,किसान शिक्षण संस्था व छत्रपती शाहू,फुले,आंबेडकर शिक्षण संस्था या सर्व संस्थेच्या अंतर्गत सर्व माध्यमिक,उच्च माध्यमिक विद्यालये व महाविद्यालयांच्या सांघिक वैयक्तिक क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या आहेत.आष्टी तालुक्यातील कडा येथील आनंदराव धोंडे काॕलेजच्या क्रीडांगणावर उद्या शनिवार १९ जुलै रोजी स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासा बरोबर खेळाचेही ज्ञान मिळावे.खेळातून पुढे जाऊन यशस्वी व्हावे,राज्य आणि देशपातळीवर ग्रामीण भागातील विद्यार्थी खेळात यशस्वी व्हावेत यासाठी गेल्या अनेक वर्षापासून अशाच प्रकारे प्रत्येक वर्षी संस्थांतर्गत क्रीडा महोत्सवाचे आयोजन आष्टी येथे करण्यात येते परंतु यावर्षी कडा येथील आनंदराव धोंडे काॕलेजमध्ये या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.संस्थेअंतर्गत सर्व माध्यमिक विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय प्राथमिक शाळा या स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत.गेल्या आठ दिवसांपासून काॕलेजच्या परिसरात वेगवेगळ्या खेळाची मैदाने बनविले आहेत.विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे संघ असून वैयक्तिक व सांघिक स्पर्धा होणार असून या स्पर्धा पाहणे व आपल्या पाल्यांचे कौतुक पाहण्यासाठी परिसरातील पालक, नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे. ----------------- प्रचंड श्रम,आत्मविश्वास,जिद्द चिकाटी,स्वावलंबन आणि समता या मूल्यांवर आष्टी, पाटोदा, शिरूर मतदार संघाचे माजी आमदार तथा शिक्षण महर्षी भीमराव धोंडे यांनी शिक्षणाची इमारत बांधली. शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून आष्टीसारख्या ग्रामीण भागामध्ये त्यांनी नावात " तेजोमय " प्रवास सर्वसामान्यांसाठी निर्माण केला आहे. या रूपानेच आज आष्टी तालुक्यासह परिसरातील सर्वसामान्य गोरगरीबांच्या जीवनात दुबळ्या,अनाथ, अपंग,शेतकरी,शेतमजूर, ऊसतोड कामगार यांच्या कुटुंबातील मुले मोठमोठ्या पदावर जाऊन देशसेवा, समाजसेवा आणि कुटुंबातून स्वावलंबी जीवनाचा यशस्वी प्रवास करीत आहेत.खरंतर भीमराव धोंडे हे शिक्षण क्षेत्रातील एक " प्रयोगशील कार्यकर्ते " आहेत. शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ ही त्यांची संस्था म्हणजे ग्रामीण भागातील सामाजिक परिवर्तनाची प्रयोगशाळा आहे. भीमराव धोंडे यांच्या आंतरिक सामर्थ्याने आणि पराकाष्ठेच्या प्रयत्नाने हा प्रयोग आज यशस्वी झालेला दिसून येत आहे.अगदी बाल वयात भीमराव धोंडे यांचे आई निधन पावल्यामुळे आईची छाया नसतानाही प्रचंड परिश्रम आणि व्यापक विचारधारेतून त्यांनी सर्वसामान्यांच्या कुटुंबामध्ये " शैक्षणिक क्रांती " घडवण्याचा केलेला हा यशस्वी प्रयत्न त्यांच्या दूरदृष्टी आणि तळागाळातील माणसाविषयी असलेल्या प्रेमाचा भाग आहे. शेतकऱ्यांसाठी मुंबई,दिल्ली मोर्चा काढणारे ते एकमेव नेते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्यांच्या भल्यासाठी शिक्षण हा मंत्र दिला फुले शाहू आंबेडकरांच्या या पुरोगामी महाराष्ट्रात ग्रामीण भागातून नवी क्रांती घडवण्याचा एक इतिहास भीमराव धोंडे यांच्या नावावर आहे शिक्षण क्षेत्रात त्यांनी क्रांती घडवली क्रांतीचे विजय खरंतर प्रथम माणसांच्या मनात निर्माण व्हावी लागतात मग क्रांतीला अंकुर फुटतात आणि नंतर कालांतराने त्याचा वटवृक्ष होतो त्या वृक्षाच्या सावलीचा असंख्य लोकांना लाभ मिळतो असाच काहीसा भाग धोंडे साहेबांच्या बाबतीत आहे.माजि आ.भीमराव धोंडे यांनी स्वावलंबनाचे तत्व साकार केले. सर्व जाती धर्माचे लोक आणि त्यांचे जीवन खऱ्या अर्थाने फुलून गेले.सामान्य माणसाला धोंडे यांच्या दूरदृष्टीमुळे आणि आष्टी शहरासह तालुक्यामध्ये विविध प्राथमिक, माध्यमिक, वरिष्ठ महाविद्यालय तसेच आरोग्य क्षेत्रामधील विविध शिक्षण संस्था धोंडे यांनी सुरु करून त्यातून संस्काराचे धडे दिले. ही मोठी " क्रांती "भीमराव धोंडे यांनी घडवून आणली आहे. या सर्व यशस्वी बाबीचा आष्टी तालुक्यातील सर्वसामान्यांना अभिमान वाटतो.शिक्षण प्रसाराच्या कामासाठी सुरुवातीच्या काळामध्ये भीमराव म्हणजे धोंडे हे मोटरसायकलवर फिरले. आयुष्यभर झगडले, गावोगावी त्यांनी " ज्ञानमंदिरे " उभारले आहेत. आज त्यांच्या शाळा महाविद्यालयामध्ये हजारो गोरगरिबांची मुले शिक्षण घेतात. संस्कार आणि स्वावलंबी होतात त्याचसमवेत सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील शेकडो शिक्षक, प्राध्यापक सन्मानाचे जीवन जगत आहेत. - ------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या