आष्टी (प्रतिनिधी)
सामाजिक बांधिलकी जपून आपल्या जीवनात सतत नवनवीन प्रयोग करून
शिक्षणातून स्वावलंबी जीवनाचा यशस्वी मार्ग चौखाळण्याचा जिद्द,चिकाटी आणि
आत्मविश्वासातूनचा प्रवास अर्थात थक्क करणार आहे! पत्रकारितेच्या क्षेत्रात दोन
तपाहून अधिक काळ वरिष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांची कारकीर्द तर राजकारणामध्ये चार
दशकावून अधिक कालावधी अत्यंत सक्षमपणे अविरत निरंतर यशस्वीपणे करून हजारो जणांना
न्याय देण्याचा प्रयत्न करणारे पत्रकारिता आणि राजकारण समाजकारणातील ही जोडी अर्थात
पत्रकार उत्तम बोडखे आणि आष्टी, पाटोदा, शिरूरचे माजी आमदार भीमराव धोंडे! एका
सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सन्माननीय रसिक प्रेक्षकांच्या
समोरच्या बेंचवर व्यासपीठाच्या समोर शांतपणे बसून मान्यवरांच्या भाषणाच्या
माध्यमातून श्रोते म्हणून उपस्थित राहून त्यांच्यातील साधेपणा या ठिकाणी अधोरेखित
झालेला दिसतो. उत्तम बोडखे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून विविध क्षेत्रात गुणवंत
अन्याय आणि अनेक प्रश्न शासन दरबारी मांडून समतोल भूमिका मांडण्याचा सदैव प्रयत्न
केला याची दखल म्हणून त्यांना विविध संस्था संघटना पक्ष आणि शासन यांच्या
माध्यमातून जिल्हा विभागीय आणि राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. माजी
आमदार भीमराव धोंडे यांनी ४० वर्ष अधिक काळ राजकारण, समाजकारण, शिक्षण, संस्कृती या
क्षेत्रामध्ये घालत शैक्षणिक सामाजिक क्रांती केले आहे सर्वसामान्य घरातील अनेक
मुले आज मोठमोठ्या पदावर त्यांच्या शैक्षणिक संस्थांमुळे गेलेले दिसून येतील. तब्बल
चार् टर्म लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळालेले आहे.
चौकट
--------
जनसामान्यांच्या हिताचे दूरदृष्टी निर्णय!
-----------------------------

माजी आमदार भीमराव धोंडे यांनी नुकताच मराठवाड्यातील सर्वात मोठा कॅन्सर हॉस्पिटल
उभारण्याचा निर्णय घेतला आहे सर्वसामान्यांची आरोग्य सेवा घडावी हा व्यापक हेतू
त्यांच्यासमोर आहे.जनहिताचा दूरदृष्टी निर्णय घेणारे भीमराव धोंडे हे अद्वितीय
राजकारणी दिसतात तर उत्तम बोडखे यांच्या माध्यमातून सकरात्मक निर्णयाला शब्दबद्ध
करण्याची विशेष हात होते यातून जनहिताचे निर्णय यापुढेही मार्गी लागावीत अशी
अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
0 टिप्पण्या