आष्टी (प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्यावतीने आयोजित गुणवत्ता शिष्यवृत्ती परीक्षा २०२४- २०२५ मध्ये गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केलेला गुणवंत विद्यार्थी सार्थक बिभिषण चाटे याचा अहिल्यानगरचे पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे, गटशिक्षणाधिकारी श्रीमती शैलाजा राऊत मॅडम यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान करून गौरव करण्यात आला. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अहमदनगर संचलित रेसिडेन्शिअल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स शेवगाव येथे गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ व रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत मार्गदर्शन कार्यक्रमात इयत्ता पाचवी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व इयत्ता आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये गुणवत्ता शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ विद्यालयाच्या भव्य मंचावर आज शुक्रवारी पार पडला. सार्थक बिभिषण चाटे यांने इयत्ता आठवी २०२४- २०२५ मधील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी मध्ये ३०० पैकी २२२ गुण प्राप्त करत गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले आहे. सार्थक चाटे हा इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती गुणवत्ता परीक्षेतील ही जरेवाडी मॉडेल स्कूलचा गुणवंत विद्यार्थी आहे. मंथन परीक्षेत यशस्वी झालेला असून हस्ताक्षर आणि निबंध स्पर्धेत ही तो मानकरी ठरलेला आहे.अहिल्यानगरचे पोलीस उपाधीक्षक संतोषजी खाडे यांच्या हस्ते सार्थक चाटे चे विशेष कौतुक करण्यात आले.गटशिक्षणाधिकारी श्रीमती शैलाजा राऊळ यावेळी रेसिडेन्सीअल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य बालाजी गायकवाड, उपमुख्याध्यापक कचरू शिंदे, पर्यवेक्षक विलास फटांगरे, समन्वयक संजय अकोलकर यांच्यासह मार्गदर्शक, सर्व शिक्षक बांधव आणि प्रमुख मान्यवर अतिथी व विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चौकट -------- वडिलांच्या विद्यार्थ्याकडून सत्कार स्वीकारताना विशेष आनंद! ---------------------------------- अहिल्यानगरचे पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे हे अत्यंत कष्टप्रद वाटचालीतून पोलीस उपाधीक्षक पदापर्यंत पोहोचले आहेत. सुप्रसिद्ध वक्ते, मार्गदर्शक आणि अत्यंत कार्यक्षम अधिकारी अशी त्यांची प्रतिमा आहे. संतोष खाडे हे गुणवंत विद्यार्थी सार्थक चे वडील प्रा.बिभीषण चाटे यांचे विद्यार्थी आहेत.वडिलांच्या विद्यार्थ्याकडून सन्मान स्वीकारताना प्रचंड आनंद झाला अशा भावना सार्थक चाटे याने माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या. हा विशेष योगायोग ठरला! -----------------------------