Ticker

6/recent/ticker-posts

आईप्रमाणे मातृसंस्थेवर प्रेम असेल तरच शैक्षणिक संस्था नावारूपास येतील --- कुलगुरु डाॕ.विजय फुलारी ....... शैक्षणिक संस्थेचे कर्मचारी हे माझे अवयव ..... संस्थाध्यक्ष माजी आ. भीमराव धोंडे

आष्टी (प्रतिनिधी) आपआपल्या जबाबदारी पाळल्या की ते कार्य चांगलेच होते.महाविद्यालयातील विद्यार्थी देशपातळीवर पोहचले की ते महाविद्यालय जगाच्या नकाशावर येते.या विद्यार्थीचे कौतुक केले जाते.शिक्षकांनी कामावर लक्ष केंद्रित करावे, पिरीअड व्हायलाच पाहिजेत. एक विद्यार्थी असला तरी.. पिरीअड झालाच पाहिजे अन्यथा मी महाविद्यालयाची मान्यता स्थगीत करीन अशा इशारा देत आईप्रमाणे मातृ संस्थेवर प्रेम असेल तरच शैक्षणिक संस्था नावारूपास येतील असे प्रतिपादन डाॕ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापाठाचे कुलगुरु डाॕ.विजय फुलारी यांनी केले. संस्थाध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे म्हणाले की,५०० बेडचे कॕन्सर हाॕस्पीटल उभारणार आहोत.संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा हे हाॕस्पीटल उभारण्यात मोठा वाटा असणार आहे. मराठवाड्यात नाही असे मोठे कॕन्सर हाॕस्पीटल करणार आहोत.संस्थेचे कर्मचारी हे माझे अवयव आहेत.मी निवडणुक जिंकल्याने जनतेचाच फायदा होणार होता कारण मी कधी गुत्तेदारी केली नाही. करणारही नाही.माझा नातेवाईक जि.प.अध्यक्ष पण करायचा नाही.नशीबात जे असते तेच होते.मी कुणाला दोष देत नाही.लोकांसाठी मी सामाजिक कार्य करीतच राहणार आहे.मी पुर्वी कर्मचारी भरती करताना कार्यकर्त्यांनी सांगितलेले पात्र शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी घेतले. संस्थेतुन शिक्षण घेऊन बाहेर पडलेले २५ हजार विद्यार्थी विविध क्षेत्रात नौकरीत आहेत. आष्टीत इंजिनियरींग काॕलेज सुरु केले आहे.आणखी दोन इंजिनियरिंग काॕलेज सुरु करणार आहोत.लोकांच्या हिताचे आणि नैतिकता संभाळुन काम करत राहणार आहे.कर्मचारी हे माझ्या शरिराचे अवयव आहेत. आष्टी शहरातील गंगाईनगर येथील आनंद शैक्षणिक संकुलात शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ,आनंद चॅरिटेबल संस्था आणि भगिनी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक सहविचार सभा आयोजित करण्यात आली.या सभेत सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक,प्राध्यापक, शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या सहविचार सभेत उपस्थितांना मार्गदर्शन करताना भीमराव धोंडे हे अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी डाॕ.संतोष आडाकुल,भास्कर चाटे,डाॕ.अजय धोंडे,अभय धोंडे, राजेंद्र धोंडे, उपसभापती नामदेव धोंडे,किशोरनाना हंबर्डे,सतीषआबा शिंदे,ॲड.हनुमंत थोरवे,विजयशेठ मेहेर,नियामत बेग, अशोक साळवे, सुखलाल मुथा, दिनकरराव तांदळे, भाऊसाहेब लटपटे, राम खाडे,प्राचार्य डाॕ.सोपान निंबोरे, प्राचार्य डाॕ.हरिदास विधाते,प्राचार्य डाॕ.दत्तात्रय वाघ,ॲड.रत्नदीप निकाळजे,इंजि. बाळासाहेब भुकन, उत्तम बोडखे, छगन तरटे,आण्णासाहेब लांबडे,अस्ताक शेख, सदाशिव दिंडे,सरपंच अशोक मुळे,संपत शेळके, संतोष कदम,संजय चंदनशिव, कुंडलीक आस्वर,उध्दव विधाते,गौतम ससाणे,गौतम सावंत,अनिल जायभाये,वाय.आर. गर्जे,रघुनाथ शिंदे, संभाजी जगताप, आदेश निमोणकर, संदीप पगारे संस्थेचे सर्व प्रशासन अधिकारी,शिक्षक वर्ग आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचीही उपस्थिती होती.ही सहविचार सभा संस्थेच्या शैक्षणिक कार्याचा व दृष्टिकोनाचा एक उत्कृष्ट प्रतीक ठरली.यावेळी संस्थेचे सहसचिव युवा नेते डॉ.अजय धोंडे यांनीही आपले प्रेरणादायी मनोगत व्यक्त करत उपस्थित शिक्षक वर्गास प्रेरणा दिली. कुलगुरु डाॕ. फुलारी म्हणाले की,खाओ पिओ आराम करो अशी आवस्था शिक्षक, प्राध्यापकांची असु नये.आई प्रमाणे मातृ संस्थेवर प्रेम असेल तर ती शैक्षणिक संस्था नावारुपाला येतेच येते असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.विद्यार्थीना शिक्षकांनी शिस्त लावावी.स्नेह मेळाव्यानिमित्त नामवंत कंपन्या बोलवा.त्यामुळे विद्यार्थीना फायदा होतो.उद्योजक निर्माण व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. मराठवाड्यातील सर्वात मोठे कॅन्सर हॉस्पिटल उभारणार! ------------------ संस्थाध्याक्ष माजी आ.भीमराव धोंडे म्हणाले की,५०० बेडचे कॕन्सर हाॕस्पीटल उभारणार आहोत.संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा हे हाॕस्पीटल उभारण्यात मोठा वाटा असणार आहे. मराठवाड्यात नाही असे मोठे कॕन्सर हाॕस्पीटल करणार आहोत.मी निवडणुक जिंकणे जनतेचाच फायदा होणार होता, कारण मी कधी गुत्तेदारी केली नाही.. करणारही नाही. माझा नातेवाईक जि.प.अध्यक्ष पण करायचा नाही. नशीबात जे असते तेच होते.मी कुणाला दोष देता नाही. लोकांसाठी मी सामाजिक कार्य करीतच राहणार आहे.मी पुर्वी कर्मचारी भरती करताना कार्यकर्त्यांनी सांगितलेले पात्र शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी घेतले. संस्थेतुन शिक्षण घेऊन बाहेर पडलेले २५ हजार विद्यार्थी विविध क्षेत्रात नौकरीत आहेत. आष्टीत इंजिनियरींग काॕलेज सुरु केले आहे.आणखी दोन इंजिनियरिंग काॕलेज सुरु करणार आहोत.लोकांच्या हिताचे आणि नैतिकता संभाळुन काम करत राहणार आहे.कर्मचारी हे माझ्या शरिराचे अवयव आहेत असे धोंडे ..म्हणाले म्धोंम्डेसाहेब . १०० पैलवान; पण कधी दादागिरी केली नाही! ------------------- ५ आॕगस्ट २०२५ रोजी आष्टीत कॕन्सर हाॕस्पीटलचे भुमीपुजन करणार आहोत.आपण कधी दादागिरी केली नाही.व्यायामशाळेत १०० पैलवान आहेत.राजकारणात कुणाच्या अंगावर घातले नाही.ते पैलवान फक्त शरीर कमविण्यासाठी पैलवान करत आहोत.आपण आपले गाव बरे असे मानुन आपण मतदर संघातच सामाजिक व शैक्षणिक कार्य करणार आहोत. देवापेक्षा श्रेष्ठ मानलेले आहे. प्राध्यापक, शिक्षक यांनी भावकी करु नये.सर्वाना सहकार्य मदत करीत राहा लोक तुम्हांला चांगलेच म्हणतील. यावेळी डाॕ. संतोष आडाकुल म्हणाले की,माणसांच्या अपेक्षांची यादी वाढली की जीवनात दुःख होते.एकाच कारणाने सर्वजणांचा आनंद गेलेला आहे ते म्हणजे तणावाने.. मनासारखे घडले नाही तर वाट्याला दुःख येते. मनाविरुध्द घटना घडली तरी डोके शांत राहायचे आणि नंतर योग्य अॕक्शन घ्यायची...मनाचा कॕन्सर सत्य स्विकारले नाही तर वाढतो...जीवन जगताना समतोलाने जगले पाहिजे. आयुष्याला बॕलेन्सिंग ठेवावे असे आवाहन डाॕ.संतोष आडाकुल यांनी केले. यावेळी प्रशासन अधिकारी डाॕ.डी. बी.राऊत,इंजि.डाॕ. संतोष आडाकुल यांनी मनोगत व्यक्त केले.संचलन प्रा.व मिसाळ व प्राचार्य डाॕ. बाळासाहेब खेमगर तर आभार प्राचार्य डाॕ.श्रीराम आरसुळ यांनी मानले.
------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या