
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी येथील हंबर्डे महाविद्यालयात कार्यालयीन अधीक्षिका सरस्वती
जाधव यांची ४० वर्षे सेवा झाली. गणित विषयाचे प्रा.विष्णू चौधरी यांची ३० वर्षे
सेवा झाली.दोघांनीही निष्ठेने आपली सेवा केली.या महाविद्यालयाचा
प्राध्यापक,कर्मचारी वृंद सचोटीने परिश्रम करीत आला आहे.त्यांनी महाविद्यालयाला
आपलं मानलं.त्यांचे विद्यार्थी उच्चपदावर सर्व दूर पसरलेले आहेत.ते आजही कर्मचारी,
शिक्षकांबद्दल आदर ठेवून आहेत.आपणही विद्यार्थी घडवले आहेत,त्यांच्यावर चांगले
संस्कार केले आहेत,याचा आनंद प्रत्येकांच्या चेहऱ्यावर दिसतो आहे.प्रत्येक जण
विश्वासाला पात्र ठरला. संस्थाचालक या नात्याने आम्हाला वाटणारा आनंद यापेक्षा
वेगळा नाही. कार्यालयीन अधीक्षिका श्रीमती सरस्वती गोविंदराव जाधव आणि प्रा.विष्णू
संभाजी चौधरी यांची सेवा म्हणूनच गौरवापलीकडची आहे असे संस्थाध्यक्ष किशोरनाना
हंबर्डे म्हणाले. दोन्हींच्या सेवा गौरव समारंभात त्यांनी हे प्रशंसनीय उद्गार
काढले.दोन्ही कार्यक्रमाला सचिव अतुल मेहेर,उपाध्यक्ष दिलीप वर्धमाने, मातोश्री
रत्नमाला हंबर्डे,सौ. सुलभा हंबर्डे,सौ.ज्योती मेहेर, सौ.अनिता निंबोरे,ज्येष्ठ
पत्रकार अनंत हंबर्डे,माजी प्राचार्य व्हि. एल.शिंदे,डॉ.प्रताप गायकवाड, सुभान
पठाण,प्रा.महेश चवरे, प्राचार्य डॉ.सोपान निंबोरे, प्राचार्या सायली हंबर्डे,
प्राचार्य बापूराव धोंडे,आदर्श शिक्षक पी.वाय.काळे,राजेंद्र लाड, सुभाष रासकर,भोसले
महाराज,श्रीहरि पुरी महाराज आजी-माजी प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.श्रीमती
लीला शिरोळे,प्रा.अविनाश कंदले,डॉ.अभय शिंदे,प्रियंका माने,पोर्णिमा
माने,प्रा.शहाजी माने,तानाजी रेडेकर,प्रा.सचिन कल्याणकर,प्रा.डॉ.दत्तात्रेय
मुंढे,लक्ष्मण रेडेकर,सोमनाथ वाळके,मधुकर गरगटे,प्रा.बिरुबा शिंदे,प्रा.सुचित्रा
जाधव,डॉ. विनय चौधरी यांनी मनोगते व्यक्त केली.संस्थाध्यक्ष किशोरनाना हंबर्डे आणि
सर्व मान्यवरांच्या हस्ते जाधव आणि चौधरी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात
आला.प्रा.डॉ.राजाराम सोनटक्के आभार मानले. पर्यवेक्षक प्रा.अशोक भोगाडे, डॉ.सखाराम
वांढरे,प्रा.रवी सातभाई यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या