Ticker

6/recent/ticker-posts

मनुष्याने..जिथे आनंदाने आदरातिथ्य होईल त्याच घरी जावे...i ............ शिवपुराण कथेत ह.भ.प. प्रकाश महाराज साठे यांचे प्रतिपादन

आष्टी (प्रतिनिधी) अध्यात्म हे सर्वश्रेष्ठ असून शाश्वत आनंदाची अनुभूती केवळ परमार्थातून मिळत असून संत सज्जनांनी सांगितलेले विचार सूर्य चंद्र असेपर्यंत कायम राहतील असा विश्वास व्यक्त करत मनुष्याने ज्यांचे घरी आनंद पूर्वक आदरातिथ्य आदररा तिथे होईल त्याच घरी जावे असा सल्ला शिवपुराण कथेत भागवताचार्य ह.भ.प.प्रकाश महाराज साठे यांनी प्रतिपादन केले. यावेळी माजी आ.भीमराव धोंडे,सौ.दमयंतीताई धोंडे,माजी आ.साहेबराव दरेकर,सुखलाल मुथा,डाॕ.मधुकर हंबर्डे, दिनकरराव तांदळे, गोविंद पवार,सोनाजी बनकर,वसंत भालेकर,अशोक डोके सर,जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,नामदेव तावरे,भाऊसाहेब कोकणे, हौसराव आजबे,डी.ए. निंबाळकर, कपीलशेठ अग्रवाल, सरपंच सौ.शालन मुळे,माजी सरपंच सौ.आदिकाताई लोखंडे, विष्णु नन्नवरे,भागवत शेकडे,जनार्धन यादव,रविंद्र पवार, आदि मान्यवर उपस्थित होते शिव कथाकार ह.भ.प.साठे महाराजांनी शिव महापुराण कथेतून आष्टी येथील हजारो भाविक भक्तांना भक्ती असाच अनुभूती देऊन आत्म तल्लीन केले. आष्टी शहरातील माऊली मंदीरात वै.संत ज्ञानेश्वर चाकरवाडीकर यांच्या २५ व्या.(रौप्यमहोत्सवी) अखंड हरिनाम सप्ताहात सुरु असलेल्या चौथ्या दिवसाच्या शिव महापुराण कथा सेवेमध्ये ते बोलत होते. प्रारंभी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रतिमेचे पूजन करून कथेला सुरुवात झाली ह.भ.प.साठे महाराज पुढे म्हणाले की,भक्तीचा महिमा थोर आहे.२४ व २५ वा.अध्याय बिल्क महिमा,भस्म महिमा भस्म धारण करण्याची पध्दती रुद्राक्ष महिमा रुद्र संहिता,रुद्राक्ष म्हणजे साक्षात मीच असे महादेव पार्वतीला सांगतात. रुद्राक्ष गळ्यात घालण्याचा नियम कठीण व कठोर आहे. मांसाहार होत असलेल्या घरात रुद्राक्षाचा प्रवेश देखील निषिद्ध असून पांढरे रंगाचे रुद्राक्ष ब्राह्मणांनी परिधान करावे.लाल, पिवळ्या काळ्या रंगाचे रुद्राक्ष वैश,क्षत्रीय यांनी परिधान करावे.कृपा प्रसन्नतेसाठी रुद्राक्ष गळ्यामध्ये परिधान करत असतात नारद दासीचे पुत्र होते.त्या पुर्वीनारद हे गंधर्व होते. सरस्वतीचा विणा नारदाच्या हाती आहे.ज्यांनी केलेली युक्ती कधीच होत नाही रद्द ते असतात ना रद...नारदाची कथा निरुपण करताना सतीखंडाचे वर्णन केले.शिव आणि सती हे रामप्रभुची कथा श्रवण करण्यासाठी अगस्तीकडे जातात.आदरातिथ्य होईल असेल त्याच घरी शहाण्या माणसाने जावे. दक्ष राजाने यज्ञ सुरु केला. सतीने यज्ञात स्वत : ला भस्म करुन घेतले हे महादेवाला कळताच महादेवाने तांडव नृत्य करीत रागाने आपल्या डोक्यावरील जटा उपटवली. त्यातून विरभद्र निर्माण झाले आणि विरभद्राने त्या यज्ञाचा नाश केला. चौकट -------------
या शिवपुराण महाकथा श्रवणासाठी आष्टी शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त उपस्थित होते. महाराजांनी अनेक दृष्टांत देऊन संत सज्जनांच्या विचार कार्याची महती प्रतिपादन केली एकूणच या शिवपुराण महाकथेमुळे आष्टी शहरात अध्यात्मिक चैतन्य निर्माण झाले आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या