Ticker

6/recent/ticker-posts

पत्रकाराच्या 'लूक चेंज' ची चर्चा होते तेंव्हा!

आष्टी (प्रतिनिधी) लोकशाही व्यवस्थेतील पत्रकार हा चौथा खांब म्हणून कार्यरत आहे.स्वतंत्र्यापासून या व्यवस्थेमध्ये सातत्याने प्रसार माध्यमांची महत्त्वाची भूमिका राहिली किंबहुना महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामध्ये पत्रकारितेचे मोठे व्यापक माध्यमांची जाळे आहे.असे म्हणतात की, महाराष्ट्रात सर्वाधिक वृत्तपत्र दैनिक साप्ताहिके असलेला बीड जिल्हा आहे. याच बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील गेल्या ४० वर्षापासून सातत्याने लेखणीशी प्रमाणिक असलेले आणि दैनिक झुंजारनेताचे उपसंपादक उत्तम बोडखे आहेत तर कार्यप्रवण युवा संपादक म्हणून अजितशेठ वरपे आहेत.या ४० वर्षात त्यांचा अनेक राजकीय दिग्गज मंत्री,खासदार,आमदार आणि लोकप्रतिनिधींशी अत्यंत जवळून संबंध आला.अनेक कलावंत, साहित्यिक, समाजकारणी, उद्योजक यांच्याही कार्याला त्यांनी आपल्या शब्दातून प्रेरणा म्हणून जनतेसमोर आणले. हे कार्य करताना त्यांना अनेक पुरस्कारानी सन्मानित करण्यात आले.तब्बल ४० वर्षाचे प्रचंड पाठीवर अनुभवाचे गाठोड असलेल्या या पत्रकारांनी काळाच्या ओघात आपल्या राहणीमानातील बदल केलेला दिसून आला.तो केलेला हा सूट कोटातील लूक अनेकांना रूचला... आणि जेष्ठ पत्रकारांसह काही मित्रवर्यांनी त्यांना भ्रमणध्वनीवरून कौतुक करून हाच लुक तुम्हाला आवडतो आणि असाच पेहराव करा असा थेट सल्लाही दिला! -----------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या