
आष्टी (प्रतिनिधी)
जीवनात ज्ञान आणि सत्याचा मार्ग दाखवणाऱ्या कबीरांचे विचार आजही
प्रासंगिक आहेत.संत कबीर दास यांची जयंती दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला
साजरी केली जाते,जी यंदा ११ जून रोजी साजरी केली जात आहे. संत कबीरदास जयंती
आपल्याला मानवता, समानता आणि दिखाव्यापासून दूर राहण्याचा संदेश देते. संत कबीर दास
हे १५ व्या. शतकातील एक महान कवी, समाजसुधारक आणि संत होते. ज्यांनी आपल्या दोहे
आणि पदांच्या माध्यमातून समाजात पसरलेल्या आडंबर,पाखंड आणि भेदभावाचा खंडन केले.
महान समाजसुधारक संत कबीर होते असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.बाबासाहेब गोरेयांनी
केले. जनविकास महाविद्यालय बनसारोळा येथे संत कबीरदास यांची जयंती साजरी करण्यात
आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब गोरे हे
उपस्थित होते.त्यांनी संत कबीर यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना आपले विचार व्यक्त
केले.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक हिंदी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. मुरलीधर लहाडे
यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.सुधाकर गोडसे यांनी तर कार्यक्रमाचे आभार जयंत
मोरे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी
उपस्थित होते.
0 टिप्पण्या