






आष्टी (प्रतिनिधी)
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये भारतातील लोकांना मारले
आहे.भारताने पाकिस्तानवर हल्ला केला नसून अतिरेकी कॅम्प उध्वस्त केले आहेत.भारतीय
सैन्यामध्ये मोठे शक्तीशाली शस्त्र असून एकाच वेळी शंभर ड्रोनवर हल्ला करू शकेल असे
शस्त्र असल्याने भारत हा शक्तिशाली देश असून पाकिस्तानने भारताची बरोबरी करू
नये.आपल्या मतदार संघतील सर्वात जास्त सैनिक हे देशसेवेमध्ये कार्यरत असून
शेतकऱ्यांची मुलेच जास्त भारतीया सेनेत आहेत. जवानांनी दाखवलेल्या साहसाला आणि
धैर्याला सलाम आहे.पाकिस्तानने भारताची बरोबरी करू नये भारतीय सैन्यामध्ये मोठी
ताकद आहे असे प्रतिपादन माजी आ.भीमराव धोंडे यांनी केले. आष्टी शहरात माजी आ.भीमराव
धोंडे यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॕलीनंतर
छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या सभेत ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी
लालासाहेब कुमकर, बाळासाहेब पवार,किशोर खोले,माऊली पानसंबळ, अशोक सव्वासे,दिलीप
म्हस्के, फौजी,भगत फौजी,गळगटे फौजी,सतीशमामा झगडे,वर्षा माळी,बाळासाहेब वाघुले,
काकासाहेब लांबरुड,पांडुरंग गावडे,अंकुश मुंढे,विठ्ठल लांडगे,आण्णासाहेब लांबडे,
झुंबर चव्हाण,गौतम सावंत, संभाजी दहातोंडे,बबन औटे, सोपान गाडे,चंद्रशेखर साके,
गोरक्ष तावरे आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी त्रिदल सैनिक संघटनेचे मेजर श्रीराम
माने,पांडुरंग नागरगोजे,अशोक साळवे,नियामत बेग, रामराव खेडकर,अजयदादा धोंडे यांचे
भाषणे झाली. यावेळी माजी आ.भीमराव धोंडे म्हणाले की,भारतीय सैनिकांनी जम्मू
काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदुर राबवत शत्रू राष्ट्र असलेल्या
पाकिस्तानवर एअरस्ट्राइक करत प्रत्युत्तर देऊन अनेक दहशतवादी अड्डे उध्वस्त
केले.ऑपरेशन सिंदुर यशस्वी केल्याबद्दल भारतीय सैनिकांच्या समर्थनार्थ आष्टीत
तिरंगा रॅली काढून सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना केले. भारत हा जगाला ज्ञान
देण्याचे काम करत असून अनेक इंजिनियर, डॉक्टर दुसऱ्या देशामध्ये चांगला प्रकारे काम
करत आहेत.देशात शेतकऱ्यांनी ही मोठी प्रगती केली आहे. जेवढा माल पिकतो आहे ते
ठेवण्यासाठी जागा देखील नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर शेतकरीही विविध
तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतीमध्ये भरघोस उत्पादन मिळवत आहेत.शेतकरी मोठ्या
प्रमाणावर कष्ट करतात.त्यामुळे त्यांचे लढण्याचे मनोबल वाढलेले असते.सैन्यामध्ये
शेतकऱ्यांच्या मुलांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. लढण्याची त्यांच्यामध्ये कष्ट
करून मोठी ताकद निर्माण झाली आहे.सैन्यांमध्ये देखीलसुद्धा आपल्याच आष्टी मतदार
संघातील मुलांची संख्या जास्त आहे.पाकिस्तानने भारताची बरोबरी करू नये. भारत हा खूप
शक्तिशाली देश झाला असून पहिल्यासारखा आपला भारत राहिलेला नाही. आपल्याकडे एकच
ब्रह्मस्त्र असे आहे की दुश्मन असलेल्या देशाचे व अतिरेक्यांचे १०० ड्रोन एकाच
वेळेस पाडण्याची ताकद या शस्त्रामध्ये असून भारतीय सैन्यामध्ये मोठी ताकद आहे.
लोकसंख्येबाबत चीनलाही भारताने मागे टाकले असून तरुणांचा देश म्हणूनही भारताची ओळख
आहे.५० पेक्षा अधिक देशांना अन्नधान्य पुरवण्याचे काम हा भारत देश करत आहे.भारताने
अतिरेकी हल्ले उध्वस्त केले अतिरेक्यांचे नेस्तनाबूत केल्याने भारतीय सैन्यांचे व
त्यांच्या शौर्याला सलाम करून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. माजी आ.धोंडे
यांच्या संपर्क कार्यालयापासून सकाळी ११ वाजता राष्ट्रगिताने रॅलीला सुरुवात झाली व
शहरातील प्रमुख मार्गावरून तिरंगा रॅली झाली.आष्टी शहरातून एक किलोमीटर तिरंगा ध्वज
हातात घेऊन निघालेल्या रॅलीने आष्टी शहर तिरंगामय झाले होते. " भारत माता की जय,"
या जयघोषाने आष्टी शहर दणाणले होते.दभक्तीपर गाणे व तिरंगामय वातावरणाने शहरात
देशभक्तीला उधाण आले होते. ही तिरंगा रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक,शनि चौक, कमान
वेस,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक, म. फुले चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभेने
समारोप करण्यात आला. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम, हम सब भारतीय है, भारतीय
सैन्यदलाचा विजय असो, वीर जवान तुझे सलाम अशा घोषणा देऊन आष्टी मतदारसंघातील सर्व
हिंदू मुस्लिम देशप्रेमी नागरिक सैदव सैनिकांसोबत आहोत,हे दाखवून दिले. तिरंगा
युवकांच्या हातात दिसून आला.‘भारतीय सैन्य जिंदाबाद’, ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की
जय’ अशा देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.प्रत्येकाच्या हातातील तिरंगे
ध्वज सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. या रॅलीमध्ये युवा नेते अजयदादा धोंडे,अभयराजे
धोंडे,अशोक साळवे, ॲड. रत्नदीप निकाळजे, आजिनाथ गवळी,पांडुरंग नागरगोजे, महाराष्ट्र
केसरी सईद चाऊस, उत्तम बोडखे, अस्ताक शेख, सरपंच सावता ससाणे, दादासाहेब
जगताप,ज्ञानेश्वर वाघ,सरपंच अभय गर्जे,संभाजी जगताप,चेअरमन अरुण सायकड,आण्णासाहेब
लांबडे, बबन औटे,बाबासाहेब ससाणे, गौतम ससाणे,बबनराव सांगळे, हादी शेख,सदाभाऊ
दिंडे,शेख आज्जुभाई,ॲड. विधाते,पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे नेते,कार्यकर्ते
मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.संचलन प्राचार्य डाॕ. बाळासाहेब खेमगर तर
उपस्थितीतांचे आभार नियामत बेग यांनी मानले.
0 टिप्पण्या