Ticker

6/recent/ticker-posts

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे उच्च शिक्षणातील योगदान अविस्मरणीय ........ डॉ.सुधाकर चव्हाण

आष्टी (प्रतिनिधी) लोकनेते गोपीनाथराव मुंडे आयुष्यभर सर्वसामान्य गोरगरीब दीन दलित, दुबळ्या अनाथ अपंग शेतकरी, शेतमजूर व कामगारांच्या शिक्षणाच्या माध्यमातून नवा आयाम दिला; किंबहुना स्वावलंबी पिढी तयार करून परिवर्तनाची तेजस्वी विचारधारा निर्माण केली!" असे सांगून लोकनेते मुंडेंचे उच्च शिक्षण क्षेत्रातील कार्य हिमालया एवढे आहे!"‌अशा शब्दात विद्यापीठ प्रशासनातील अधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ.सुधाकर चव्हाण यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिदिनी अभिवादन करून नतमस्तक झाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना गौरवोद्गार काढले. छत्रपती संभाजी नगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीतील गोपीनाथ मुंडे इन्स्टिट्यूट एमएनआयआरडी येथे ३ जून रोजी गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून पुष्प अर्पण केले.यावेळी डॉ.सुधाकर चव्हाण बोलत होते.समवेत डॉ. गजानन सानप, डॉ.संजय साळुंखे, आनंद वाघ यांच्यासह सर्व मान्यवर अधिकारी पदाधिकारी कर्मचारी मान्यवर आदींची उपस्थिती होती. हिंदुस्तानचे माजी स्वर्गीय ग्राम विकास मंत्री लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिदिनी राज्य आणि देशभर विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या गोपीनाथराव मुंडे इन्स्टिट्यूट मध्ये स्वर्गीय मुंडेंच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.माध्यमांशी बोलताना डॉ. सुधाकर चव्हाण म्हणाले की, लोकनेते गोपीनाथ मुंडे हे राजकीय सामाजिक वैचारिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील चालते बोलते विद्यापीठ होते. उच्च शिक्षण घेऊन त्यांनी सर्वसामान्य ग्रामीण आणि बहुजन समाजातील मुलांना शिक्षण घेण्यासाठी अनुकूल वातावरण तयार केले. त्यांनी उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध शाखांना दिलेला निधी त्यांच्या या महान कार्याची साक्षात प्रचिती देतो. चौकट -------- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले,सावित्रीबाई फुले यांचे योगदान देशाच्या विविध क्षेत्रात मौल्यवान आहे. त्यांच्या विचार कार्याला स्मरूण लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी चालण्याचा प्रयत्न केला. मराठवाड्याचे केंद्रस्थान असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात डॉ. सुधाकर चव्हाण, डॉ. संजय साळुंखे, आनंद वाघ यांनीही आपल्या विचारातून गोपीनाथराव मुंडेंच्या महान कार्यावर शिक्कामोर्तब केले. ----------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या