Ticker

6/recent/ticker-posts

मनुष्य जन्म, मोक्षप्राप्ती आणि साधुसंतांची भेट हा दुर्लभ योग --- भागवताचार्य रोहिदास महाराज ........... कै.भानुदास खामकर यांच्या वर्षश्रद्धानिमित्त ह.भ.प.रोहिदास महाराज यांचे हरी किर्तन संपन्न

आष्टी (प्रतिनिधी) "मनुष्य देह अत्यंत दुर्लभ आहे किंबहुना मनुष्य नरदेह , मोक्षाची प्राप्ती आणि साधुसंतांची भेट या तीन बाबी अत्यंत दुर्लभ आहेत असे सांगत जीवनात सत्संग,सदाचार, चांगले विचार आणि संत संगती मनुष्याला ईश्वर प्राप्तीकडे घेऊन जातात असे भावोद्गार ज्येष्ठ कीर्तनकार हातोला येथील भागवताचार्य ह.भ.प.रोहिदास महाराज शास्त्री यांनी व्यक्त केले. दैनिक झुंजारनेताचे तात्कालीन माजी निवासी संपादक स्व.श्रीपती माने यांचे सासरे आणि महादेव खामकर व आदिनाथ खामकर यांचे वडील कै.भानुदास देवजी खामकर वनवेवाडी (मातावळी) यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने हातोला येथील भागवताचार्य ह.भ.प.रोहिदास महाराज शास्त्री यांचे हरिकीर्तन संपन्न झाले. यावेळी आष्टी तालुक्यातील राजकीय,धार्मिक, सामाजिक, क्षेत्रातील भाविक भक्त आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.भागवताचार्य ह.भ.प.रोहिदास महाराज शास्त्री यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगांच्या अनुषंगाने विस्तृत विवेचन करताना अनेक दृष्टांत दिले. मानवी जीवन दुर्लभ असून मानवी जीवनात संत सेवा, ईश्वर सेवा करण्याचा योग आहे. सकारात्मक दृष्टी ठेवून संत सज्जनांच्या विचारांची पूजा करणारे माणसे जीवनात सुखी आणि समृद्धी होऊ शकतात असा आशावाद ही त्यांनी व्यक्त केला. भागवताचार्य ह.भ.प.रोहिदास महाराज शास्त्री म्हणाले की,स्व. श्रीपती माने यांनी पत्रकारिता क्षेत्रातून माणसे जोडली. त्यांचे सासरे कै. भानुदास देवजी खामकर यांनी वनवेवाडी (मातावळी) यासारख्या ग्रामीण भागामध्ये सातत्याने आध्यात्मिक क्षेत्रात स्वतःला झोकून देत कृषी जीवन आणि समाज जीवनाशी नाळ जोडली. साधेपणा चांगुलपणा हा त्यांच्या जीवन शैलीचा एक भाग होता हे वैशिष्ट्ये सांगताना त्यांनी अनेक त्यांच्या जीवनातील कठोर प्रसंगांनाही यावेळी व्यक्त केले.या कीर्तन सेवे प्रसंगी वनवेवाडी मातावळी आदीसह आष्टी तालुक्यातील तसेच जामखेड भागातून हे भाविक भक्त आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चौकट -------- संत संगतीतून आत्मिक समाधान ----------------- कै.भानुदास देवजी खामकर यांनी आपल्या आयुष्यात संतांच्या विचार कार्याला स्मरण आपले जीवन व्यतीत केले. साधेपणा,कष्ट, परिश्रम आणि सदविचाराशी एकरूप राहून जीवन जगण्याचा प्रयत्न केला त्यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने त्यांचे विचार आपण तेवत ठेवू असे यावेळी सांगितले.
----------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या