Ticker

6/recent/ticker-posts

आष्टी येथील शासकीय आयटीआयमध्ये शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रम संपन्न

आष्टी (प्रतिनिधी) श्री गुरुलिंग स्वामी जीबकाटे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आष्टी येथे शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून ना.मंगलप्रभात लोढा मंत्री कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग यांचे संकल्पनेतुन भव्य शिवराज्यभिषेक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या विशेष कार्यक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हिडीओद्वारे करण्यात आले. श्रीमती मनीषा वर्मा (अप्पर मुख्य सचिव, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग) यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा संदेश पाठवून उपस्थितांचे उत्साहवर्धन केले. या कार्यक्रमास आ.सुरेश धस यांची उपस्थिती होती. बेरोजगारीच्या समस्येवर कौशल्य शिक्षण हाच उपाय असल्याचा प्रभावी संदेश दिला. त्यांनी युवकांना व्यवसायाच्या दिशेने वाटचाल करण्याचे आवाहनही यावेळी केले. शिवराज्याभिषेक दिन फक्त साजरा न करता छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध गुण युवकांनी आपल्या अंगी उतरवावेत प्रामाणिकपणे शिक्षण घेऊन आपल्या आईवडिलांचे स्वप्न साकार करावेत सार्वजनिक संपत्तीचे व पर्यावरणाचे रक्षण करावे शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली व प्रागतिक राज्य उभे केले छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली स्वतःची अशी युद्धनीती विकसित केली जी गनिमी कावा म्हणून ओळखले जाते कार्यक्रमात कु. शिवकन्या सौंदनकर हिने आपल्या ऑन-जॉब ट्रेनिंगचा अनुभव शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रबोधन निकाळजे यांनी सोशल मीडियापासून दूर राहून युवकांनी कौशल्य शिक्षणाकडे लक्ष देण्याचे महत्त्व अधोरेखित केले.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्रीधरपंत सहस्त्रबुद्धे यांनी शिवराज्याभिषेकाचा इतिहास सांगत त्याचा सण म्हणून महत्त्व विशद केले. त्यांच्या मनोगताच्या शेवटी त्यांनी स्वदेशी वस्तू वापरण्याचा प्रेरणादायी संदेश दिला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांनी तंत्र प्रदर्शनाला भेट देत प्रशिक्षणार्थ्यानी तयार केलेल्या विविध प्रकल्पांचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयटीआयचे प्राचार्य श्री गणेश हडतगुणे यांनी केले तर सूत्रसंचालन एम.जी.पवार सर यांनी प्रभावीपणे पार पाडले. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. यावेळी नगराध्यक्ष जिया बेग, माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे, अशोक जीबकाटे, ॲड.प्रबोधन निकाळजे, अक्षय शिरस्वाल, कैलास रेडेकर, गणेश (नाना) शिंदे, गौतम आजबे, विनोद रोडे, सुनिल सानप,नितेश करडुले, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या